चोरीची माहिती देणाराच निघाला गुन्हेगार
*🛑चोरीची माहिती देणाराच निघाला गुन्हेगार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०१:-* बेळणे खुर्द येथील बंद असलेल्या फॅब्रिकेशन कारखान्यामधील ८३ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरले होते. या कारखान्याच्या मालकाला या चोरीच्या घटनेची माहिती तेथेच राहणाऱ्या संदीप चाळके या भाडेकरूने दिली होती. मात्र, पोलीस तपासात माहिती देणाऱ्या संदीप चाळकेचाच या चोरीत हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरीत आणखी काहींचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बेळणे खुर्द येथे सतीश सीताराम दळवी (५६, मूळ बेळणे खुर्द व सध्या रा. मालाड – मुंबई) व त्यांचे भाऊ संतोष सीताराम दळवी यांनी २००५ मध्ये कारखाना सुरू केला. मात्र तो २०१५ पासून बंद आहे. कारखान्याच्या बाजूलाच सतीश, संतोष यांचे राहते घर असून त्यातील एका खोलीत संदीप पांडुरंग
चाळके (३९) हा कुटुंबासह भाड्याने राहतो. सतीश दळवी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैच्या रात्री फॅब्रिकेशन कारखान्यामध्ये कुणीतरी बॅटरी पेटवून काहीतरी करीत असल्याचे संदीप चाळके याच्या लक्षात आले. यावेळी एकजण कारखान्याच्या पाठीमागील भिंतीवरून उडी मारून पळून गेल्याचे त्याला दिसले. संदीप याने याबाबत सतीश दळवी यांना कळविले. त्यानुसार सतीश व संतोष मुंबईहून दुसऱ्याच दिवशी कारखान्याकडे दाखल झाले.
सतीश दळवी यांनी पाहणी केली असंता कारखान्यातील तीन कटिंग मशीन, पॉवर प्रेस मशीनचे पार्ट, हँडप्रेस मशीन, पाईप मशीन बेंडिंगचे पार्ट, दोन बेंच ग्रॅन्डर, तीन बेंच व्हाईस, चार हँड ग्रॅन्डर, ७५ लुज डाईज, दोन वेल्डिंग मशीनचे पार्ट आदी बरेच साहित्य चोरीस गेल्याचे आढळले. त्यामुळे सतीश दळवी यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_