कणकवलीकोकणमहाराष्ट्र

मोबाईल शॉपीचालकाची सतर्कता, दुचाकी सोडून युवक पसार

*🛑मोबाईल शॉपीचालकाची सतर्कता, दुचाकी सोडून युवक पसार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०१:-* शहरातील एका मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल लॉकचा पासवर्ड विसरल्याचे सांगून तो उघडून देण्याची मागणी करणाऱ्या युवकाचा शॉपीच्या मालकाला संशय आला. याबाबत सतर्क असलेल्या त्या शॉपीच्या मालकाने पोलिसांशी संपर्क साधताच संबंधीत संशयीत युवक तो मोबाईल व सोबत आणलेली दुचाकी तेथेच सोडून पसार झाला. पोलिसांनी सदरचा मोबाईल व दुचाकी ताब्यात घेतली आहे. शहरातील बाजारपेठेत महापुरुष कॉम्प्लेक्स येथे परेश आचरेकर यांची भालचंद्र मोबाईल शॉपी आहे. या शॉपीमध्ये बुधवारी सायं. ४ वा. च्या सुमारास एक युवक आला. त्याने परेश यांना त्याच्याकडील मोबाईल लॉक झाला असून पासवर्ड विसरल्याचे सांगितले. हा पासवर्ड उघडून देण्याची मागणी त्याने केली.
यावेळी त्याने दुकानाच्या बाहेर त्याची दुचाकी उभी केली होती. मात्र, परेश यांनी त्या युवकाला मोबाईलचे लॉक उघडून देण्यासाठी आधारकार्ड लागेल, असे सांगून आधारकार्डची मागणी केली. मात्र, त्याने आधारकार्ड नसल्याचे सांगून तेथून तो युवक मोबाईल तेथेच सोडून दुचाकीकडे जाऊ लागला. त्याने दुचाकी आपल्या काकांची असल्याचेही सांगितले. मात्र, परेश यांनी त्याच्याकडे चौकशी करताच सदरचा युवक गाडी व मोबाईल तेथेच टाकून बाजारपेठेत पसार झाला. याबाबत परेश यांनी वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. संशयीत मोबाईलच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्येही कैद झाला आहे. विनोद चव्हाण व परेश आचरेकर यांनी मोबाईल व कर्नाटक पासिंगची दुचाकी पोलीस स्थानकात आणून जमा केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!