कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

गेळे मधील सर्वे नंबर १९ व २० सर्वे नंबर आरक्षणातून वगळण्याचा प्रस्ताव शासनाला सादर!

*🛑गेळे मधील सर्वे नंबर १९ व २० सर्वे नंबर आरक्षणातून वगळण्याचा प्रस्ताव शासनाला सादर!*

*🛑सर्वसामान्य जनतेसाठी सरकार असल्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रचिती*

*🛑उपोषणकर्ते संदीप गावडे यांचे उपोषण अखेर मागे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴गेळे, दि-२८:-* सावंतवाडी तालुक्यातील गेळे येथील स. नं. १९ व स. नं. २० मधील आरक्षित केलेले क्षेत्र गेळेवासियांच्या सम प्रमाणात वाटपात समाविष्ट करावे या मुख्य मागणीला पालकमंत्र्यांचा आदेशाने शासनाला फेर प्रस्ताव आजच पाठविण्यात आला. यामुळे गावठाण व गावठाण विस्तारासाठी तसेच सार्वजनिक सोयीसुविधांकरीता शासनास आवश्यक असलेले २७,०० हे.आर. क्षेत्र ग्रामस्थांचां म्हणण्यानुसार संपूर्ण क्षेत्राचे मोजणीनंतर निश्चित करण्यात यावे या प्रमुख मागणी मान्य केली. व तसे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सावंतवाडी तहसीलदारांचा हस्ते उपोषण कर्ते संदीप गावडे यांचे उपोषण गेळे वासियांना उपस्थितीत मागे घेण्यात आले. गेळे वासियांची वहिवाट असलेला सर्वे नंबर १९ आणि २० शासकीय संपादनातून वगळण्याचा प्रस्ताव आजच महसूल मंत्र्यांकडे पाठवावा. व वहिवाटीप्रमाणे जमीन वाटपातील अडचण दूर करावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सिंधुनगरी येथील गेळेवासियांच्या उपोषण स्थळी दिले. तर महसूल मंत्री विखे पाटील या नाही मोबाईलद्वारे संपर्क साधत हा प्रश्न आपल्या सरकारला सोडवायचा असल्याबाबत त्यांचे लक्ष वेधल्याने महसूल व वन विभागाचे शुद्धिपत्र काढून गेळे वासियांचा हा प्रश्न सुटेल अशी त्यांनी संदीप गावडे यांना ग्वाही भाजपा महा युतीचे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्याची प्रचिती या घटनेतून देईल असेही पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले! यावेळी पालकमंत्र्यांसमवेत उपोषण स्थळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, आमदार निरंजन डावखरे, अतुल काळसेकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, भाई सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. संदीप गावडे उपोषण कर्ते व त्यांच्या सोबत गेळे सरपंच सागर ढोकरे,विजय बाबाजी गवस,आनंद वसंत गावडे,नितीन तुकाराम गवस, गोपाळ फटू परब,बाबुराव अप्पा सावंत, प्रकाश लाड
मनोहर बंड,नारायण गवस,महादेव पवार,अंकुश गवस, सतीश गवस, तातोबा गवस,विजय गवस,नारायण लाड सुरेश गावडे,दशरथ कदम अंकुश कदम, विश्वनाथ दळवी,महादेव नार्वेकर, राजू गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सावंतवाडी तालुक्यातील गेळे येथील जमीन मालकांना जमिनीचे वाटप करताना अडचण आली आहे. तत्कालीन त्रिसदसीय चुकीच्या अहवालामुळे गेळे गाववासीयांवर अन्याय झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत असून हा अन्याय आपण दूर करणार आहोत. गेळेमधील जनतेची वहिवाट असलेला सर्वे नंबर १९ व २० वगळून उर्वरित जमिनीमधून शासनाला हव्या असलेल्या जमिनीचे संपादन करावे असा प्रस्ताव शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी महसूल मंत्र्यांकडे पाठवावा असे आदेश उपोषण स्थळी भेट देतात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. व गेले वासियांचा हा प्रश्न आपल्या सरकारला तातडीने सोडवायचा आहे असेही महसूलमंत्र्यांना मोबाईल द्वारे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे गेळे वासियांचा हा प्रश्न सुटेल असा विश्वास निर्माण झाला आहे.
आंबोली चौकुळ व गेळे येथे गेली २५ वर्षापासून अधिक काळ कबुलातदार गावकर हा प्रश्न या जमिनीत गावात यांची घरे, शेती, बागायती, शेतमांगर अशी वयवाट असताना जमिनी नावावर होत नसल्यामुळे अनेक वर्ष गावाशी यांचा संघर्ष सुरू होता. भाजप युती सरकारने हा प्रश्न सोडविण्यासाठी शासन निर्णय जारी केला. गेळेवासीयांनी अनेक वर्ष वहिवाट असलेली जमीन त्यातील घरे त्यातील भात शेती बागायती व परंपरागत वापर कायम ठेवला आहे. त्या खऱ्या मूळ मालकांना सम प्रमाणात वाटप होण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन हा चांगला निर्णय घेतला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेते असून वहिवाटीप्रमाणे शेतकऱ्यांना जमीन मिळावी यासाठी अनेक वर्ष रखडलेला हा प्रश्न सोडविला होता. मात्र तत्कालीन २०१८ सालचा सदस्यीय समितीने दिलीप या धोरणाला खो घातल्याचे दिसते. त्यावेळीची ही चूक आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारावी व सर्वे नंबर १९ व २० मधील आरक्षण वगळण्याचा आदेश महसूल मंत्र्यांकडे तातडीने म्हणजे आजच पाठवावा असे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. तसेच महसूल मंत्र्यांकडून शुद्धिपत्र काढून आपण पाठपुरा करू असे आश्वासीत केले.

तसेच उपोषणकर्त्यानी वन जमिनी संदर्भात आजचं निवेदन द्यावे जेणेकरून सचिव स्थरावरती या विषयाचा निपटारा होईल व सदरचा धोरणात्मक निर्णय हा आंबोली आणि चौकुळ साठी लागू होईल. यामुळे संदीप गावडे यांचे उपोषण यशस्वी झाले असे म्हणावें लागेल. सर्वे नंबर १९ व २० मधील जमीन वहिवाटीप्रमाणे त्या त्या शेतकऱ्यांना त्याच जमीन मालकांना सम प्रमाणात दिली जाईल व सर्वसामान्य जनतेसाठी भाजपाचे हे सरकार आहे याची प्रचिती या जिल्ह्यातून गेळे वासीयांवरील अन्याय दूर करून दिली जाईल व स्वतः जिल्हाधिकारी महसूलमंत्र्यांना दिलेला प्रस्ताव आजच पाठवून उपोषण करताना लिंबू पाणी देऊन हे उपोषण आजच सोडवतील अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देत गेळे वासीयांना प्रश्न सोडविण्याचा विश्वास दिला.

निव्वळ महारष्ट्र शासन असलेल्या क्षेत्राची मोजणी भुमिअभिलेख विभागातर्फे सोमवारपासून सुरू करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले. तसेच सदरची मोजणी, हद्द कायम दहा दिवसात पूर्ण करणार असे आश्वासित करण्यात आले. गेले दोन दिवस सुरू असलेल्या संदीप एकनाथ गावडे व समस्त गळे वासियांचे हे उपोषण जिल्हाधिकारींनी महसूल मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून त्याची एक प्रत संदीप गावडे यांना सुपूर्त केली आता मंत्रालय पातळीवर म्हणजे महसूल व वन विभागाकडून यावर कार्यवाही होईल. व शुद्धिपत्र निघून सर्वे नंबर 19 व 20 मधील वहिवाट असलेली जमीन शेतकरी जनतेला त्याचे सम प्रमाणात वाटप होईल. यासाठी पुढील संदीप एकनाथ गावडे हे पाठपुरावा करतील. उपोषणकर्ते व गेळे मधील सर्वच नागरिकांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयाचे व केलेल्या पाठपुराव्या बाबत समाधान व्यक्त केले आहे.चौकट उपोषणकर्ते संदीप गावडे व समस्त गेळेवासी यांच्या परिपूर्ण प्रस्तावासमोर महसूल विभागाला झुकावे लागले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!