गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आरोंदा शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप
*🛑गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आरोंदा शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप*
*🛑शाळा नं.१ व कन्या शाळेतील एकूण ५० विध्यार्थ्यांना देण्यात आल्या छत्र्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि-२५:-* शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून,श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आरोंदा च्या वतीने श्री शंकर मठकर यांच्या तर्फे आरोंदा शाळा क्रमांक १ व कन्या शाळेतील एकूण ५०मुलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन,सरस्वती पूजनाने करण्यात आली.यावेळी पुष्पगुच्छ,श्रीफल देऊन उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. आरोंदा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. अरूण धर्णे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात निवृत्त शिक्षक श्री.मनोहर ऊर्फ बाळ आरोंदेकर,श्री एन् के राणे ,माजी विद्यार्थी श्री दीपक रेगे, श्री अरूण धर्णे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत, आईवडील, गुरूजन, समाज,शाळा यांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील असलेले महत्त्वाचे स्थान विशद करून सांगितले.शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री गुरुनाथ मेस्त्री यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व मुलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.मुलांना शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त भेटवस्तू देण्याचा उपक्रम मागीलवर्षी पासून सुरू केला असल्याचे शंकर मठकर यांनी सांगितले.समाजातील सेवाभावी व्यक्तींकडून आर्थिक सहाय्य घेऊन आणि स्वत:च्या योगदानातून हे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.हा उपक्रम अव्याहत सुरू ठेवण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.शाळेच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक गणपत गावडे यांनी शाळेतील मुलांना छत्र्या वाटप केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री गणपत गावडे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन बाळ आरोंदेकर यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक श्री आवडण, श्रीमती राणे,श्रीमती नाईक,श्रीमती निउंगरे,श्री गणपत गावडे तसेच पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

