मा. राजन तेली वाढदिवस विशेष
*सिंधुदुर्गातील भाजपच्या यशात मोलाचा वाटा असलेले राजन तेली विधानसभेत पुन्हा एकदा नशीब आजमावणर*
*संघटन कौशल्याच्या जोरावर राजन तेली मतदारसंघात ठरताहेत उजवे*
माजी आमदार व भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात जवळपास मागील पंचवीस-तीस वर्षे अवरीत काम करणारे नेतृत्व मानलेजाते.शिवसेनेचा कणकवलीतील शाखा प्रमुख ते थेट विधान परिषद आमदार असा राजन तेली यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
पहिल्याच टर्ममध्ये १९९९ ला राजन तेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पदही त्यांनी यशस्वीपणे भूषविले व त्या पदाला साजेसे कामही केले, जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष पदही त्यांनी यशस्वीपणे भूषविले.आपल्या अध्यक्ष पदाच्या कारर्किर्दित त्यांनी जिल्हा बँकेला वैभव प्राप्त करून दिले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूकीत दोनवेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले मात्र ते कधीच निराश निराश झाले नाहीत त्यांनी आपले समाजकार्य अविरतपणे सुरुच ठेवले.मागिल विधानसभा निवडणुकीत ते विजयाच्या जवळ पोहचले होते मात्र पक्षाचे कमळ निशाणी त्यांच्या कडे नसल्याने त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.
जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना त्यांनी थेट हात घालत पाठपुरावा केला त्यामध्ये जिल्ह्यातील बेरोजगारी,मच्छीमारांचा प्रश्न आरोग्याचा, शेतकरी वर्ग, बागायतदार,मंदिरांचा प्रश्न,सर्वांच्या न्यायासाठी ते नेहमीच झटत राहिले. म्हणूनच पुन्हा एकदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून ते आपले नशीब आजमावण्याच्या ते प्रयत्नात आहेत.
राजन तेली यांचं व्यक्तिमत्व अतिशय संयमी,शांत, प्रामाणिक समाजसेवेची आवड असलेले असे नेतृत्व आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांनी संघटनात्मक बांधणी करताना अधिकाधिक पक्ष बळकटीवर भर दिला याचाच फायदा त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झाला. प्रयत्नातून मतदारसंघातल्या बऱ्याचश्या ग्रामपंचायती या भाजपकडे खेचून आणल्या आहेत.सहकारी सोसायट्यांवर भाजपची सत्ता आहे. मात्र सावंतवाडी मतदारसंघात गेली १५ वर्ष शिवसेनेचे मंत्री दिपक केसरकर हे आमदार म्हणून निवडून येत आहे. भविष्यात सावंतवाडी मतदारसंघ भाजपला मिळावा ह्या साठी ते अथक प्रयत्न करत आहेत. राजन तेली यांना युतीतून जागा मिळाल्यास राजन तेली हे मोठया मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही…
माजी आमदार राजन तेली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

