समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या संवेदनेची जाण असणा-या सामाजिक संस्थांची समाजाला गरज -डी. बी.वारंग
*🛑समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या संवेदनेची जाण असणा-या सामाजिक संस्थांची समाजाला गरज -डी. बी.वारंग*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२४:-* “समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या संवेदनांची जाणीव ज्या सामाजिक संस्था असते अशा सामाजिक संस्थांची समाजाला नितांत गरज आहे.अनेक दुःखीत, पीडित लोक समाजामध्ये अनेक वेदनेसह जगताना दिसतात.या वेदना , दुःख समजून घेणारी त्यांना आपलंसं करणारी संस्था किंवा एन.जी.ओ.यांची नितांत गरज आज समाजाला भासत आहे. शैक्षणिक क्षेत्रात तसेच आरोग्य क्षेत्रात गोरगरिबांना मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवणारी माणसे समाजाच्या उन्नतीत भर घालत आहेत आणि उन्नत समाज निर्माण करत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. यामध्ये कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग ही संस्था आपले सामाजिक उत्तरदायित्व जपत योगदान देत आहे ही आनंदाची बाब आहे ” असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे चेअरमन यांनी येथे केले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था,सिंधुदुर्ग व गोगटे- वाळके कॉलेज,बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांच्या गुणगौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री.वारंग यांनी हे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे चेअरमन दयानंद कुबल , जिल्हा व्यवस्थापक प्रथमेश सावंत,तालुका समन्वयक हनुमंत गवस, भगवान चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर आदीजन उपस्थित होते. यावेळी विविध परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागा प्रमुख प्रा.डॉ.के.के. म्हेत्री,इंग्रजी विभागाचे प्राध्यापक निरंजन आरोंदेकर,प्रशासकीय विभागातील श्री. व्यंकटेश गवंडळकर आदींचा त्यांच्या उचित कार्याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या यावेळी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने बोलताना दयानंद कुबल म्हणाले की,”ही संस्था आदिवासी पाड्याबरोबरच समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करते आहे.समाजामध्ये कौशल्य विकसित करणे,गोरगरीब दीन- दुबळे यांच्या जीवनात आनंदी क्षण आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.शिक्षणापासून अलिप्त असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे . विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्ती ,विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ, कौशल्यवर्धित उपक्रमातून समाजात नवचैतन्य आणण्याचा काम ही संस्था करीत आहे.” यावेळी संस्थेच्यावतीने जिल्हा व्यवस्थापक प्रथमेश सावंत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य गोविंद काजरेकर म्हणाले की, ” सामाजिक संस्थेचा उद्देश गोरगरीब जनतेच्या उन्नतीसाठी असावा.यातूनच एक सक्षम समाज निर्मिती होत असते ” कार्यक्रमाचे आभार प्रा. आर.एम.काजरेकर यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ.एन.डी. कार्वेकर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

