कोकणशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

डॉ. आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्या!

*🛑डॉ. आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्या!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२४:-* जिल्हयाच्या हद्दीपासून ०.५ किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयातील अकरावी, बारावी व नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे: विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा. विद्यार्थी जिल्हा ठिकाणातील हद्दीपासून ०.५ किमी परिसरातील असलेल्या महाविद्यालयातील अकरावी, बारावी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. जिल्हानिहाय अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा आहे ही संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे जास्त संख्येने अर्ज सादर झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
या योजनेबाबतची माहिती व अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १३ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयात या योजनेविषयीच्या अटी व शर्तीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालयात महाविद्यालयांच्या तसेच नजीकच्या शासकीय वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षाला भोजन भत्ता २५ हजार रु., निवास भत्ता १२ हजार रु. व निर्वाह भत्ता ६ हजार रु. असे एकूण ४३ हजार रु. इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येईल. वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी ५ हजार रु. व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी २ हजार रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचे अर्ज भरून व अर्जासोबत दिलेल्या सूचीमधील आवश्यक कागदपत्रांसह ९ ऑगस्ट अखेरपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय, महाविद्यालय, शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयात सक्षम किंवा टपालाद्वारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या ०२३६२-२२८८८२) ( कार्यालयाशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!