कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

कोणत्याही परिस्थितीत राजन तेली निवडणूक लढवणार हे लागलेल्या शुभेच्छा बॅनरवरून होते सिध्द

*🛑कोणत्याही परिस्थितीत राजन तेली निवडणूक लढवणार हे लागलेल्या शुभेच्छा बॅनरवरून होते सिध्द*

*🛑राजन तेली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लागलेल्या बॅनरवर विधानसभेची छबी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२४:-* भाजपचे माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार राजन तेली व तीन वेळा विजयाची हॅट्रिक करणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यामधील शाब्दिक वार अनेक वेळा दिसून आलेत. आता राजन तेली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर वर राजन तेलींची गरज सावंतवाडीच्या आरोग्य सुधारण्यासाठी ,विकासासाठी अशा प्रकारचे बॅनर लागल्याने कोणत्याही परिस्थितीत राजन तेली विधानसभा निवडणूक लढवणार आहे हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजन तेली अगदी थोडक्यात मताने पराभूत झाले होते, त्यावेळी ते अपक्ष लढले होते, पक्षाचे अधिकृत चिन्ह कमळ निशाणी त्यांना मिळाली नव्हती,मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांना बऱ्यापैकी साथ दिली होती, गेली पंधरा वर्षे राजन तेली सावंतवाडी मतदारसंघात भक्कम पाय रोवून उभे आहेत, अगदी खेडोपाडी जावून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे, व शाखाप्रमुख पासून माजी आमदार पर्यंत त्यांच्या यशाचा चढता आलेख पाहता आता त्यांच्या दृष्टीने ही शेवटची निवडणूक आहे व आरपारची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राजन तेली निवडणूक लढवणार अशी चर्चा नाक्या नाक्यावर ऐंकायला मिळत आहे,आता नाही तर कधीच नाही या उक्ती प्रमाणे राजन तेली यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना जोहूबाजूने घेरण्याचा प्रयत्न केला आहे ,तेवढ्याच ताकदीने केसरकर यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे, याबद्दल माजी आमदार राजन तेली यांनी केसरकरांचा पंधरा वर्षातील लेखाजोखा मांडून केसरकर यांना येणार उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारी ,आरोग्य बाबतचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणून केसरकर यांनी केलेल्या घोषणांचा पोलखोल करण्याचा प्रयत्न करून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तर पूर्ण मतदार संघात लागलेले बॅनर हे राजन तेली निवडणूक लढवणारच याचे बोलके उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!