कणकवलीकोकणमहाराष्ट्र

राज्याचे मत्स्य विकास धोरण ठरविताना पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्य द्या.

*🛑राज्याचे मत्स्य विकास धोरण ठरविताना पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्य द्या.*

*🛑आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत मांडली आग्रही मागणी*

*🛑मंत्री सुधीर मुनगंटीवार,मत्स्योद्योग विकास धोरण समितीचे आध्यक्ष राम नाईक यांच्या उपस्थितीत झाली बैठक*

*🛑कोकणातील आमदार व निमंत्रित सदस्य होते उपस्थित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२४:-* पारंपरिक मच्छिमार हा गरीब मच्छिमार आहे. राज्याचे मत्स्य विकास धोरण ठरत असताना त्याच्यावर कोणताही अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पारंपरिक मच्छीमार आहेत आणि हा पारंपरिक मच्छिमार जगला पाहिजे अशा पद्धतीचे धोरण ठरले जावे. प्रत्येक जिल्ह्याची मासेमारीची वस्तुस्थिती वेगवेगळी आहे.त्याचा विचार करून मत्स्य धोरण ठरवावे.अशी आग्रही मागणी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत मांडली.
मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपस्थितीत, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण ठरवण्यासाठी माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक झाली. बैठकीत आमदार नितेश राणे यांनी कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी आणि त्यावर एलईडी मासेमारीचा होणार त्रास याविषयी निवेदन केले. पावसाळी अधिवेशन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशी कोकणातील सर्व आमदारांना घेवून माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून मच्छिमार धोरण ठरविण्याचे आश्वासन दिले होते.
यावेळी मच्छिमार बांधवांच्या अडचणीवर चर्चा करताना आमदार नितेश राणे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या मच्छीमारांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्हानिहाय मच्छिमार धोरण ठरत असताना तेथील स्थानिक मच्छीमारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जावी. एलईडी मासेमारी सारखा प्रकार होत असताना. त्यांना नियम अटी आणि कायद्याची बंधने घातलेली असताना सुद्धा ती मोडली जातात. त्यासाठी काही अधिकारी अशा परप्रांतीय एलईडी मासेमारीला प्रोत्साहन देतात.एलईडी मासेमारीवर केली जाणारी दंडात्मक कारवाई ही फारच तूटपुंज असते. लाख दोन लाख रुपयाचा दंड अशा एलईडी धारकांना किरकोळ असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या संगतमताने हे प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात. ही दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात केली जावी अशी मागणी यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.
या बैठकी साठी उद्योगमंत्री उद्योग मंत्री उदय सामंत,आमदार राजन साळवी ,आम.भाई जगताप,आम.महेश बालदी, आम.श्रीमती मनिषा चौधरी, आम.आशिष जयस्वाल आम.पंकज भोयर, आम.रमेश पाटील, आमदार प्रवीण दटके, आदी सह निमंत्रित सदस्य उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!