कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चा “इम्पॅक्ट”
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चा “इम्पॅक्ट”*
*मळगाव – वेत्ये रोडवर उन्मळून पडलेले “ते” झाड पीडब्ल्यूडी कडून हटवून रस्ता केला वाहतूकीसाठी मोकळा.*
मळगाव – वेत्ये रोडवर वादळी वाऱ्यामुळे कोसळलेले झाड ” कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज ” चॅनेल वर बातमी लागताचं क्षणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने कटर मशीनद्वारे तोडून बाजूला करण्यात आले आहे.
रोडवर पडलेले झाड अंधारात कोणताही अनर्थ घडण्याआधी लवकर बाजूला केल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

