कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी नगरपालिकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली सदिच्छा भेट

 

आपला दौरा प्रचारासाठी नसून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आहे आ.आशिष शेलार

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले भाजप चे नेते आशिष शेलार यांचे सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने शहरात पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वागत केले.
त्यानंतर आमदार शेलार यांनी नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली.
आपला दौरा हा प्रचारासाठी नसून आता काही दिवसात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आहे असे मत शेलार यांनी यावेळी
सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली अतुल काळसेकर नगरसेवक परिमल नाईक, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, अजय गोंदवळे, दादू कविटकर,दिलीप भालेकर ,मोहिनी मडगावकर,मिसबा शेख, बंटी पुरोहित चेतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!