घोणसरी येथे विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू
*🛑घोणसरी येथे विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१८:-* घराच्या न्हाणीघरातील तारेवर कपडे सुकत घालत असताना तारेमधून विद्युत प्रवाह येऊन विजेच्या धक्क्याने सौ. विनया विनोद कारेकर (३३) या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना घोणसरी- खवळेभाटले येथे मंगळवारी सायं. ५ वा. च्या सुमारास घडली. घरातील शॉर्ट झालेल्या वायरमधून कपडे सुकत घालण्याच्या तारेमध्ये वीज प्रवाह येऊन ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत विनयाचे पती विनोद जयवंत कारेकर (४०) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. घोणसरी-खवळेभाटले येथील विनया कारेकर यांच्या घरातून न्हाणीघरात बल्बसाठी एक वायर नेण्यात आली होती. ही वायर न्हाणीघरातील लोखंडी खांबाला गुंडाळून ठेवली होती. याच खांबाला कपडे सुकत घालण्यासाठी जीआय तार बांधण्यात आली होती. बल्बसाठी आलेली वायर शॉर्ट होऊन खांबाद्वारे वीजप्रवाह कपडे सुकत घालण्याच्या तारेमध्ये आला होता. कपडे सुकत घालताना याच तारेला स्पर्श होऊन विनया कारेकर यांना जबरदस्त विजेचा धक्का बसला. धक्का एवढा जबरदस्त होता की त्या जागीच कोसळल्या. घटना घडली त्यावेळी त्या एकट्याच घरी होत्या. घरातील बाकी सर्व सदस्य शेतात कामाला गेले होते. मुलगा घरी आल्यानंतर त्याला आपली आई खाली निपचीत पडलेली दिसली अन् हा प्रकार स्पष्ट झाला. मुलाने ओरड मारताच आजुबाजूचे लोक धावत आले आणि वीज मीटर बंद करून प्रवाह खंडित करण्यात आला. मात्र, विनया यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कणकवली पोलिसांना कळविण्यात आली. फोंडाघाट दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार सचिन माने, पोलीस उपनिरीक्षक शेडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस हवालदार वंजारे करीत आहेत. विनया कारेकर यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

