कोकणसिंधुदुर्ग

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सावंतवाडी बस स्थानकावरील प्रसाधनगृह दुरुस्ती करून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सावंतवाडी बस स्थानकावरील प्रसाधनगृह दुरुस्ती करून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत.

 

गेले कित्येक दिवस सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड वरील प्रसाधनगृह भर पावसाळ्यामध्येच दरवाजांना लोखंडी जाळ ठोकून बंद करण्यात आले होते.

या स्थानावरुन नेहमी प्रवास करणारे असंख्य विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व स्थानिक व्यापारी यांची भलतीच गैरसोय होत होती या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने अवघ्या चार दिवसांमध्ये सावंतवाडी नगरपरिषद, आगार व्यवस्थापक व स्थानिक व्यापाऱ्यांच्या सहकार्याने सदर प्रसाधनगृह दुरुस्ती करून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणल.

यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व राजू मसुरकर यांनी सावंतवाडी नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक मापसेकर व सॅनिटरी इन्स्पेक्टर पांडुरंग नाटेकर यांचे सहकार्य मिळवून दिले.

सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव,रूपा मुद्राळे सुजय सावंत घाणीला न कंटाळता स्वतः राबवून नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर प्रसाधनगृहाच्या साफसफाई केली सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर व सुजय सावंत यांनी घाणीत उतरून सर्व घाण कचरा साफ केला.खान साफ टाकीची पूर्णपणे दुरुस्ती करून टाकीची साफसफाई केली तसेच प्रसाधनगृह आतून बाहेरून धुवून स्वच्छ करून त्याला नळ कनेक्शन जोडून बाहेरून वाहतून रंग रंगोटी करून रात्रीच्या वेळी आज प्रसाधनगृहामध्ये कोणी घाण करून ठेवू नये म्हणून सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांच्याकडून दोन्ही दरवाजांना ग्रील लावण्यात आले आणि सदर प्रसाधनगृहाला सामाजिक बांधिलकीने एक नाविन्य प्राप्त करून दिले.

सदर प्रसाधनगृह दर दिवशी साफसफाई ठेवण्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांनी स्वीकारली आहे.

अशा या सामाजिक बांधिलकीच्या अनोख्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र स्तुती व कौतुक होत आहे याचे कारण रोज प्रवास करणारे असंख्य विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, डायबिटीस पेशंट व महिलांचे होणारे हाल पाहून सामाजिक बांधिलकीने स्वतः पुढाकार घेऊन आज हजारो लोकांना त्याचा फायदा करून दिला आहे. याप्रसंगी आगार व्यवस्थापक निलेश गावित, सहाय्यक व्यवस्थापक संदीप मोहिते, स्थानक प्रमुख विशाल शेवाळे, अरुण पवार व वाहतूक नियंत्रक तेजस तारी उपस्थित होते. निलेश गावित यांनी सामाजिक बांधिलकी संस्थेला आभार पत्र देऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!