केसरी ग्रामविकासाचे पर्यटन-मॉडेल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या व्हिजनरी दृष्टीचे प्रतिक!
*🛑केसरी ग्रामविकासाचे पर्यटन-मॉडेल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या व्हिजनरी दृष्टीचे प्रतिक!*
*🛑केसरीत जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प राबवत जिल्ह्याच्या विकासाला त्यांनी दिलेली दिशा राज्याला आदर्शवत – विशाल परब*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१६:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी हे गाव अवघ्या काही कालावधीतच जगभरात पर्यटनाचा आकर्षण बिंदू म्हणून नावारूपाला आले आहे. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियनला आज देशोदेशीचे पर्यटक भेट देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे व्हिजनरी कार्य कसे असते, ते यामधून दिसून येत आहे. पर्यटनामध्ये विकासाची किती ताकद असू शकते हे केसरीसारख्या छोट्याशा गावात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक्वेरियमची निर्मिती करून त्यांनी स्वानुभवातून दाखवून दिले आहे. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटकांच्या नजरेत अनोखे कौतुक प्राप्त होत असून जिल्ह्यातील युवावर्गाला यातून मिळणारी प्रेरणा आशादायक आहे असे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी म्हटले आहे. आज केसरी येथे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री इथल्या एक्वेरियममध्ये सुरू करण्यात येत असलेल्या “स्वाद केसरी” या नव्या अद्यावत रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. केसरीमध्ये रविंद्र चव्हाण यांनी सुरू केलेले ॲक्वेरियम, त्यामधील मत्स्यसंपत्ती, देशोदेशीचे विविध पक्षी, आकर्षक गार्डन यांनी समृद्ध असून अद्वितीय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. आज पर्यटकांच्या सुविधेसाठी स्वाद केसरी रेस्टोरंटचा शुभारंभ करत पर्यटन क्षेत्रात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासह सावंतवाडी तालुका सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजपा ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दीप्ती भालेकर, माजी नगरसेविका समृद्धी विरनोडकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, अमित गवंडळकर, माजी नगरसेवक गुरु मटकर, नागेश जगताप, सुरेश नेवगी, मयूर लाखे, राजू बेग आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

