कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

फरसाण कारखान्यातील एक लाख रु. घेऊन कामगार पसार

*🛑फरसाण कारखान्यातील एक लाख रु. घेऊन कामगार पसार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-१६:-* ओरोस-खर्येवाडी येथील एका फरसाण कारखान्यातील तीन कामगारांनी एक लाख आठ हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. या प्रकरणी लखन रजपूत, श्रवण रजपूत, बळीराम रजपूत (रा. उत्तरप्रदेश) या तीन संशयितांवर संगनमताने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील भरणी येथील करण परब यांनी ओरोस-खर्येवाडी येथे करण एन्टरप्रायजेस नावाने फरसाण बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यात तीनही संशयित कामगार होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. ते आटोपून १५ रोजी पहाटे तीनच्या सुमारास करण परब यांच्यासह तीनही कामगार कारखान्यातच झोपले होते. सोमवारी सकाळी फरसाणची डिलिव्हरी करण्यासाठी जायचे असल्याने करण यांनी १ लाख ८ हजारांची रोकड सोबत ठेवली होती. सकाळी ते उठले असता सोबतचे कामगार व रोकड जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात देत तीनही कामगारांवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे संशयितांवर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३०६, ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. रोकड घेऊन पोबारा केलेल्या संशयितांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रदीप गोसावी तपास करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!