श्री सहकारी ओवळीये ग्रामस्वराज्य संस्था ओवळीये नूतन संचालक मंडळाचे भाजपच्या वतीने अभिनंदन
सावंतवाडी, दि. १३:- श्री सहकारी ओवळीये ग्रामस्वराज्य संस्था,ओवळीये याची ४ जागांसाठी निवडणूक झाली.आधीच ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या.त्यात चंद्रकांत कृष्णा नाईक (ओबीसी मा. प्रवर्ग ), नेहा नंदकिशोर सावंत (महिला प्रतिनिधी), लाडू कृष्णा जाधव (मागास प्रवर्ग ) ह्या बिनविरोध झाल्या. तर महादेव धोंडी देसाई, जगन्नाथ शिवराम सावंत, रत्नदीप लिंगोजी सावंत, सखाराम महादेव सावंत हे ४ जागा जिंकल्या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री सहकारी ग्राम स्वराज्य संस्था ओवळीये यांच्या आहे यांनी जिंकल्या. त्याबद्दल जिल्हा बँक संचालक, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस महेश सारंग यांनी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर,माजी जि. बँ.गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई,आत्माराम गावडे, बाळू शिरसाठ, मनोज सावंत, सागर सावंत,भिवा सावंत, हनुमंत सावंत, संतोष सावंत, बाळकृष्ण सावंत, विष्णू सावंत, चंद्रकांत राऊळ, भाऊ सावंत, सचिव रमेश सावंत, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन राणे यांनी काम पाहिले. अशी माहिती ग्रामस्वराज्य पॅनेल चे प्रमुख सागर सावंत यांनी दिली.

