भविष्यातील स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी शालेय जीवनापासूनच करा- शिवराज झांजुर्णे..
*🛑 भविष्यातील स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी शालेय जीवनापासूनच करा- शिवराज झांजुर्णे..
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१३:-* ‘विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळ इतर स्पर्धा परीक्षा यामध्ये देखील वेळोवेळी सहभाग घेऊन स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले पाहिजे व नव्या आव्हानांना सामोरे जाण्यास सदैव तत्पर राहिले पाहिजे. शाळेतील विविध कार्यक्रम व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. शालेय शिस्त विद्यार्थ्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे ते या शाळेच्या प्रांगणात असेच बहरत राहो ‘असे प्रतिपादन बांदा पोलीस स्थानाकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे
यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
शनिवार दिनांक 13 जुलै रोजी प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या पदवी संपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. प्रशालेच्या सभागृहात विद्यार्थ्यांचा पदवीदान कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिवराज झांजुर्णे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट, उपमुख्याध्यापक फादर रॉबिन आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर केले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 2024 -25 या शैक्षणिक वर्षाच्या ल्युमिनस या लोगोचे अनावरण करण्यात आले. प्रशालेच्या कार्यकारणीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बॅचेस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षेत यश संपादन करून ग्रामीण सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड झालेला कु. रणवीर काळे तसेच ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये इंग्रजी व विज्ञान विषयांत राज्यस्तरीय गुणवत्ता प्राप्त केलेल्या कुमार शाहिस्ता अली, कु. क्लीन्टन फर्नांडिस व कु. श्रेया राठोड यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच ओलिंपियाड परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होऊन त्यांनी उत्तम यश संपादन केल्याबद्दल शाळेला गोल्डन स्कूलअवॉर्ड तसेच मुख्याध्यापकांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट यांना गौरविण्यात आले.
प्रशालेचे उपामुख्याध्यापक फादर रॉबिन यांनी विद्यार्थ्यांना ‘अशक्य असे काहीच नाही तुम्ही प्रयत्न करत रहा आणि तुम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा,स्वतःच्या वा शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विकासासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा ‘ अशा शब्दांमध्ये संबोधत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी कु.मृदुला सावंत तर आभार प्रदर्शन कु.वेदिका माने हिने केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

