पाडलोसमध्ये 10 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
पाडलोस गाव व्हॉटस्अॅप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.10 ऑगस्ट रोजी संध्या.5 वा.श्री देव रवळनाथ मंदिरात स्पर्धा पार पडणार. भजन स्पर्धेचे तिसरे पर्व असून यावर्षी ‘करूया भजन थाटांच्या संगतीने’ संकल्पनेवर आधारीत आहे.
स्पर्धेसाठी 8 ते 10 संघांची निवड केली जाणार आहे.प्रथम पारितोषिक रुपये 7001 व सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 5001 व सन्मानचिन्ह, तृतीय रुपये 3001 व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक रुपये 1501 व सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 1001 व सन्मानचिन्ह तसेच उत्कृष्ट गायक, हार्मोनियमवादक, पखवाजवादक, तबलावादक, झांजवादक,कोरस, गजर,राग सादरीकरण यांनाही रोख रक्कम व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दि.17 जुलै पर्यंत नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी नियम व अटी असल्याचे पाडलोस गाव व्हॉटस्अॅप ग्रुपचे अध्यक्ष राजाराम(पपी) गावडे व सचिव प्रणीत गावडे यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी खजिनदार अमेय गावडे (9819690068) यांच्याशी संपर्क साधावा.

