वैभववाडीत लक्झरी बस मध्ये चौवीसवीस हजार रुपये किमतीचा सीगारेट माल जप्त
वैभववाडी चेक पोस्ट वर कारवाई चालकासह किल्नर वर गुन्हा दाखल
वैभववाडी प्रतिनिधीकरुळ घाट मार्गे मुंबई ते गोवा अशी प्रवाशी वाहतूक करतांना लक्झरी बस मधून वैधानिक इशारा नसलेल्या 24 हजार रुपये किंमतीची सिगारेटचा माल वैभववाडी पोलिसांनी जप्त करुन लक्झरी चालकसह क्लिनरवर गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई करुळ चेकपोस्ट वर शनिवारी सकाळी 8:30 वाजता केली.
लक्झरी चालक इंदरसिंग हिरालालजी गुजर वय वर्षे 45 ,क्लीनर भैरु शंभु नाथ वय वर्षे 43 दोघेही राहणार मध्य प्रदेश अशी त्यांची नावे आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करूळ चेक पोस्ट येथे ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी बस क्रमांक एम .एच .07-पी. 8200 या नंवरच्या लक्झरी मधून तंबाखूजन्य पदार्थ सिगारेट च्या पाकिटावर वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटची पाकिटे व आढळून आली. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई व पोलीस कॉन्स्टेबल मारुती सोनटक्के, संदीप राठोड तपासणी करत असताना सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा नसल्याचे आढळून आले. दरम्यान लक्झरी बस वैभववाडी पोलीस स्टेशन येथे आणून पोलिसांनी पंचनामा करून यांच्याविरोधात वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .लक्झरी मधला 24000 किमतीचा वैधानिक इशारा नसलेला तंबाखूजन्य सिगारेट जप्त केला आहे.ही कारवाई तंबाखू प्रतिबंधक कायदा कलम 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे.

