कोकणमहाराष्ट्रराजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत पोलीस संचलन

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवू नये म्हणून खंबाळे ते कोकिसरे येथे रंगीत तालीम

वैभववाडी प्रतिनिधी
:ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत शनिवारी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संचलन केले. तालुक्यात १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शनिवारी तालुक्यातील खांबाळे ते कोकिसरे येथे रंगीत तालीम घेण्यात आली.
यावेळी संचलन करताना वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह पोलिस अधिकारी दोन, उपविभागीय कार्यालयातील अधिकारी एक, अमंलदार आठ, होमगार्ड अकरा, आरसीसी प्लाटून, वज्र वाहन एक तसेच एक पोलिस स्टेशनचे वाहन सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!