कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या पदोन्नत्यांनंतर दिलेल्या “पदस्थापना” संशयाच्या भोवऱ्यात?

*🛑जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या पदोन्नत्यांनंतर दिलेल्या “पदस्थापना” संशयाच्या भोवऱ्यात?*

*🛑भ्रष्टाचारातून आधीच “बुक” झालेल्या ग्रामपंचायती वगळून पदस्थापना दिल्याच्या जिल्हा परिषदेत रंगू लागल्या खमंग चर्चा..!*

*🛑जि प ग्रामपंचायत विभागाने समुपदेशन प्रक्रियेआधिच अर्थपूर्ण ‘वाटा’घाटीतुन रडीचा डाव खेळल्याचा प्रसाद गावडेंचा गंभीर आरोप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर* *

*🎴सिंधुदुर्ग, दि-११:-* अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या समुपदेशन प्रक्रियेत भ्रष्ट कारभार झाल्याचा आरोप ताजा असतानाच दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवक दर्जा कर्मचाऱ्यांच्या झालेल्या पदोन्नत्यानंतर त्यांना दिलेल्या पदस्थापना या वादाच्या व संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या खमंग चर्चा जिल्हा परिषदेत रंगू लागल्या आहेत. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने रडीचा डाव खेळत काही ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या “रिक्त” जागा आधीच लक्ष्मी कृपेने “बुकिंग” करून त्या राखीव कोट्यात ठेवल्या..व संपूर्ण समुपदेशन प्रक्रिया अर्थपूर्ण पद्धतीने मॅनेज करून शिल्लक उर्वरित जागा नव्याने पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात मारल्या गेल्या आहेत. समुपदेशन प्रक्रिया मॅनेज करण्यासाठी ग्रामपंचायत विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे ग्रामसेवक पदोन्नती यादीच अंधारात ठेवून ती आयत्यावेळी उजेडात आणली.पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘बुकिंग जागा” वगळून “त्या” मर्जी राखणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे राखून ठेवण्यात आल्या.एवढेच नव्हे तर दुपारी समुपदेशन प्रक्रिया दाखवून सायंकाळी अगदी घाई गडबडीत “मॅनेज” जागांसाठीचे विनंती बदल्यांचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे लगबगीने ई-मेल करण्यामागे मोठा आर्थिक घोडेबाजार झाल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी करत जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच ग्रामपंचायत विभागाने सर्वसामान्य जनतेच्या पैशांतून अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगच्या नावाखाली मुळदे येथील एका रिसॉर्टवर रात्रौच्या वेळेस पार्टीचे आयोजन केल्याचे उजेडात आले होते.
एकूणच गावोगावी स्वच्छतेचा जागर करणारे जिल्हा परिषद प्रशासन स्वतः भ्रष्टाचाराच्या चिखलातून खऱ्या अर्थाने स्वच्छ व पारदर्शी कधी होणार असा प्रश्न जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. ग्रामीण पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणासाठी महत्वाचा घटक दुवा समजल्या जाणाऱ्या ग्राम”सेवकांना” पोस्टिंगसाठी भागवाभागवी करावी लागणे म्हणजे भविष्यात त्यांच्याहातून गावची सेवा प्रामाणिकपणे घडली जाणार का हाही प्रश्न उदभवतो.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात एका शिक्षकाला शालेय मुलांना शिक्षणाचे धडे देण्यापासून वंचित ठेवून शिक्षणाधिकारी कार्यालयात “कलेक्शन” साठी राखून ठेवले जाते? आज ग्रामपंचायत विभाग मर्जी राखणाऱ्या ग्रामसेवकांसाठी आर्थिक ‘वाटा’घाटीतून काही ग्रामपंचायतींच्या रिक्त जागा बेकायदेशीरपणे राखून ठेवतो? सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा “आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय” असा एकंदर भ्रष्ट कारभार उजेडात आल्यानंतर देखील प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबतीत कठोर भूमिका घेत नाहीत हे सिंधुदुर्गवासीयांचं दुर्दैव म्हणावे लागेल. झालेल्या प्रकारांची गंभीर दखल घेऊन त्यावर कारवाई होणार की भ्रष्ट अधिकाऱ्यांना नेहमीप्रमाणे पाठीशी घातले जाणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.जिल्हा परिषदेकडील खातेप्रमुखांच्या या मनमानी कार्यपध्दतीबाबत लवकरच कोंकण विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधनार असल्याचा इशारा प्रसाद गावडेंनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!