कोकण रेल्वे अद्यापही बंद ;पेडणे मालपे बोगद्यात युद्धपातळीवर काम सुरु
*🛑कोकण रेल्वे अद्यापही बंद ;पेडणे मालपे बोगद्यात युद्धपातळीवर काम सुरु*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पेडणे गोवा, दि-१०:-* कोकण रेल्वेच्या पेडणे मालपे बोगद्यामध्ये बुधवार दि. १० जुलै रोजी पहाटे पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने येथील रेल्वे वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्याचे मार्ग बदलण्यात येत आहेत. गाड्या रद्द झाल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.कोकणात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोंकण रेल्वेला मोठ्या प्रमाणांत पडला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवार दि. ९ रोजी दुपारी ३.४५ वाजल्यापासून रेल्वे गाड्या ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. मालपे टनेल मधील पाणी आणि चिखल काढण्याचे काम युध्दपातळीवर करुन मार्ग मोकळा करण्यात आला होता. मंगळवारी रात्री उशिरा अडकलेल्या सर्व गाड्या मार्गस्थ करण्यार आल्या होत्या. कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ९ ते १० तास उशिराने गाड्या धावत होत्या.पेडणे गोवा मालपे या ठिकाणी गतवर्षी देखील असा प्रकार घडला होता. रेल्वे रूळावर खालून पाणी येत असल्याने गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवल्या. तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मालपे टनेलमधील पाणी आणि चिखल काढल्या नंतर अडकलेल्या गाड्या मार्गस्थ झाल्यावर बुधवारी पहाटे पुन्हा पाणी या टनेलमधे पाणी भरले आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्याचे मार्ग बदलण्यात येत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमधे रेल्वे क्रमांक १२४४९ मडगांव -चंढीगड एक्सप्रेस, रेल्वे क्रमांक १२६२० मंगलुरु – लोकमान्य टिळक, रेल्वे क्रमांक १२१३४ मंगलुरु- मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस, रेल्वे क्रमांक ५०१०७ सावंतवाडी-मडगांव पेसेजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतून दि. ९ रोजी रात्री सोडण्यात आलेल्या रेल्वे गाडी क्रमांक २०१११ मुंबई-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस आणि रेल्वे क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक -मंगलुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकापर्यत सोडण्यात येऊन तिथून या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे बाबत अधिक माहिती मिळावी, या प्रवाशांच्या सुविधेसाठी ०८३२-२७०६४८० हा दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_