आणखीकोकणसिंधुदुर्ग

अखेर बिल्डरला नाल्यावरील अतिक्रमण हटविण्या संदर्भात नगरपंचायतीची लेखी नोटीस…

 

संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे भविष्यात ड्रेनेज वाॅटर व पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्वप्रथम मनसेने आवाज उठवल्यानंतर कुडाळ नगरपंचायतीच्या 17 हे नगरसेवकांनी अतिक्रमण प्रश्नी आक्षेप घेतला होता. त्याचप्रमाणे कुडाळ शहरातील जागृत नागरिकांनी सुद्धा वेळोवेळी मुख्याधिकारी यांना गैरसोई बाबत विचारणा केली होती. तरीसुद्धा नाला अतिक्रमण प्रश्न नगरपंचायत मार्फत दुर्लक्ष केले जात होते. यानंतर शेवटी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देताच नगरपंचायत प्रशासनाने नैसर्गिक रित्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गावरील अडथळा हटवून सदरचा मार्ग पूर्ववत करण्याच्या लेखी स्वरूपात नोटीस देऊन सूचना केली आहे. या नोटीसीमध्ये स्पष्ट शब्दात हा नैसर्गिक नाला आहे.आणि बिल्डर्स ने त्याच्यात अडथळा निर्माण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यावर रजेवर असलेले मुख्याधिकारी काय निर्णय घेणार की नोटीसी पुरतेच ठाम रहाणार हे महत्त्वपूर्ण आहे. या सर्वावर येत्या काळात मनसे कोर्टात न्याय मागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!