कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

आम्ही चालवू हा पुढे वारसा

*🛑आम्ही चालवू हा पुढे वारसा….!!*

*🛑नेमळे शाळेतील विद्यार्थ्यांना भाजपा नेते रविंद्र चव्हाण आणि खा.नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल परब यांनी केले दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* नेमळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सकाळ, चिमुकल्या आवाजाने किलबिललेली. आणि या सगळया शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भाजपा नेते रविंद्र चव्हाण व खासदार नारायणराव राणे यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार राबवल्या जात असलेला दप्तर व शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आज नेमळे जि.प.शाळेत अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन करण्यात आले होते. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी चिमुकल्यांसोबतच्या एका छोट्या कार्यक्रमात सुंदर असे दप्तर आणि शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना केले. यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की “प्रगतीची वाट शिक्षणातून जाते. भाजपाच्या कोकणातील सर्व नेत्यांना इथल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेवरील आर्थिक संघर्षाची कल्पना आहे. आपले नेते रविंद्रजी चव्हाण, नारायणराव राणे यांची आजची यशस्वी वाटचाल ही कधीकाळी अशाच संघर्षातून झालेली आहे. मी स्वत:देखील या परिस्थितीतून गेलो असल्याने रविंद्रजी चव्हाण आणि नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दप्तर वाटपाचा कार्यक्रम राबवत आहे. उपस्थित शिक्षक व पालकवर्गाने यावेळी विशाल परब यांच्या या गरजेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि मोठे होऊन आमचे विद्यार्थीही भाजपाच्या या समाजसेवेचा वारसा निश्चितपणे पुढे चालवतील असा शब्द विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत, सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाटात दिला. यावेळी विशाल परब यांच्या समवेत नेमळेचे माजी सरपंच श्री.विनोद राऊळ, ॲड अनिल निरवडेकर, गाव प्रमुख मनोहर राउळ, बुथ अध्यक्ष सुनील राऊळ, प्रविण वेंगुर्लेकर, भास्कर राऊळ, नंदकुमार देवळी, प्रकाश नेमळेकर, शशिकांत नाईक, समीर नेमळेकर, रोहित राऊळ,साई नाईक, ग्रा.प. सदस्या गौरवी कुणकेरकर, सुहास पिकुळकर, गुरुनाथ पिकुळकर, साक्षी राऊळ, विनित राऊळ, मुख्याध्यापक श्री विठ्ठल तुळसकर, शक्ती केंद्र प्रमुख
गौरव मुळीक, महिला गाव अध्यक्षा तन्वी राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!