प्राथमिक शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन
*🛑प्राथमिक शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-१०:-* समुपदेशन प्रक्रिया राबवून विकल्प भरुन घेतलेल्या शिक्षकांना तात्काळ बदली आदेश द्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीनेही आवाज उठवला आहे. त्याचबरोबर अन्य विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मंगळवारी दुपारी जि. प. समोर लक्षवेधी धरणे आंदोलन छेडले. प्रशासनाने पुढील १५ दिवसात यावर कार्यवाही करावी, अन्यथा २२ जुलैपासून धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रश्नांबाबत शिक्षणविभागाचे प्राथमिक शिक्षक भरती संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा लक्ष वेधण्यात आले होते. यामध्ये आंतर जिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करावे, समांतर आरक्षणात समुपदेशन झालेल्या शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया नव्याने राबवून बदलीधारक शिक्षकांना आंतरजिल्हाने रिक्त होणाऱ्या जागा दाखविण्यात याव्यात, पवित्र प्रणालीतील नवीन शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर करावे, नवीन शिक्षकांचे मे व जून चे मानधन देण्यात यावे, २००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची डीसीपीएस रक्कम व सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते भविष्य निर्वह निधी खात्यात जमा करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अरुण पवार राज्य संघटक किसन दुखंडे, दया नाईक, रवींद्र देसाई, महेश नाईक, आशा गुणिजन, वैशाली गर्कळ, गोविंदराव जाधव, मंगेश खांबाळकर, दिनकर शिरवलकर, चंद्रकांत गवळी, रामचंद्र डोईफोडे, विजय जाधव, रामचंद्र सातवसे, मंगेश बागवे, संजय घाडी, सिद्धार्थ नेरुरकर, नितीन मणचेकर, कृष्णा कालकुंद्रीकर, प्राजक्ता कनयाळकर, सुनिता पाटील, जयश्री कोरगावकर, मंगल नाईक, शीतल परुळेकर, राकेश करणे, संतोष कोचरेकर, संतोष परब, श्रीराम विभूते आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

