दोन दिवसांच्या अतिवृष्टीत देवगडला १४ लाखांची हानी
*🛑दोन दिवसांच्या अतिवृष्टीत देवगडला १४ लाखांची हानी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-०९:-* देवगड तालुक्याला सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शिरगाव, दाभोळे गावाला बसला आहे. तालुक्यात झालेल्या पडझडीमध्ये सुमारे १४ लाखाचे नुकसान झाले. जामसंडे खाकशी येथे एका घरानजीकची संरक्षक भिंत व न. पं. ची पायवाट कोसळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. धालवली येथे रविवारी मध्यरात्री पूरसदृश स्थिती निर्माण झाली. वाडा येथील आंबेडकर चौक परिसर जलमय होऊन तेथील रस्ता पाण्याखाली गेला होता. सोमवारी सकाळी ८ पर्यंत एकूण १९८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. वाडा येथील आंबेडकर चौक परिसर जलमय झाला होता. तेथील रस्ता पाण्याखाली गेल्याने देवगड- विजयदुर्ग मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मोंड येथील कोळंबी प्रकल्पासमोरील मार्गावर दरड कोसळून रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवून तासभरात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. किंजवडे येथील राजन शांताराम किंजवडेकर यांच्या घराच्या मागील सुमारे २० फूटाची चिरेबंदी भिंत कोसळून त्यांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. जामसंडे खाकशी येथील श्रीधर पुंडलिक पेडणेकर यांच्या घरानजीकची संरक्षक भिंत कोसळून तसेच तेथील न. पं. ची पायवाट कोसळून दोन लाखाचे नुकसान झाले. धालवली येथे पुराचे पाणी तेथील दोन- तीन घरांत शिरले. तेथील कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

