आपत्कालीनकणकवलीकोकणमहाराष्ट्र

फोंडाघाटातील अवजड वाहतूक बंदचा निर्णय

*🛑फोंडाघाटातील अवजड वाहतूक बंदचा निर्णय*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴फोंडाघाट, दि- ०९:-* तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसात फोंडाघाट रस्त्यावरील मीराला भगदाड पडल्याची घटना घडली आहे. यामुळे फोंडाघाटातील अक्जेंड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी तातडीने घटनास्थळी जात पाहणी केली. रस्त्याच्या मधोमध हे भगदाड असल्याने मोरीचे काम तातडीने हाती घेण्यात येत असून दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले. दरम्यान, यामुळे अवजड वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळवावी लागणार आहे. सध्या करूळ घाटातील वाहतूक बंद असतानाच फोंडाघाट हाच कोल्हापूर, पुणेकडे जाण्यासाठीचा सोईचा मार्ग आहे. मात्र, फोंडाघाट बाजारपेठेपासून घाटमार्गाकडे सुमारे १३ कि.मी. अंतरावर असलेल्या मोरीला रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्याचे सोमवारी सकाळी लक्षात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता श्रीमती के. के. प्रभू यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मोरीचे काम आजच सायंकाळपर्यंत सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच सायंकाळी पुन्हा भेटही दिली.दरम्यान, याबाबत माहिती मिळताच तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनीही फोंडाघाटमध्ये जाऊन. पाहणी केली. मोरीला मधोमध होल असल्याने अवजड वाहतूकीला मोरी अडचणीची ठरू शकण्याच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक या मार्गावरून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर छोट्या वाहनांना परवानगी देण्यात आली होती. पुढील दोन दिवस अवजड वाहतूक यामार्गे बंद राहण्याचा अंदाज आहे. सोमवारी तातडीने काम हाती घेण्यात ते असून दोन दिवसांत काम पूर्ण करण्यात येईल, असे सर्वगोड यांनी सांगितले. मात्र, या साऱ्या परिस्थितीत करूळ घाटमार्ग बंद असल्याने अवजड वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळवावी लागणार असून यामुळे वाहनचालकांना नाहूक जादाचा प्रवास करावा लागणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!