आणखीपुणेमहाराष्ट्रसामाजिक

🛑 एस. पी. महाविद्यालयाच्या वसतिगृहात आग; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴पुणे, दि-०७:- सर परशुरामभाऊ (एस. पी.) महाविद्यालयातील वसतिगृहात वीज मीटरला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान, तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्वरित आग आटोक्यात आली. आग लागल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

एस. पी. महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठ्यासाठी वापरात असलेल्या सीटी मीटरने रविवारी (दि. ७) सकाळी पेट घेतला. मीटरने पेट घेताच मोठा आवाज झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निरोधक उपकरणाचा वापर करून आग आटोक्यात आणली. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दल आणि महावितरणला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. महावितरणच्या पर्वती विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वीज मीटरची, तसेच विद्युत यंत्रणेची पाहणी केली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जनता वसाहत केंद्रातील जवान सागर देवकुळे, महेंद्र सकपाळ, उमेश शिंदे, सागर पाटील, विजय वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली.

 

जनजागृतीमुळे गंभीर दुर्घटना रोखण्यास मदत..

 

अग्निशमन दलाकडून शहरातील महाविद्यालय, मॉल, शाळा, रुग्णालयांच्या परिसरात आग लागल्यास करायच्या उपाययोजना, अग्निरोधक उपकरणांचा वापराबाबत माहितीपर व्याख्यान, तसेच प्रात्यक्षिकांचे नियमित आयोजन केले जाते. जगजागृतीमुळे गंभीर स्वरूपाच्या घटना रोखण्यास मदत झाली आहे. या अस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अग्निरोधक उपकरणांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एस. पी. महाविद्यालयातील आग आटोक्यात आणण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली.

 

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!