कणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन १० जानेवारी रोजी कणकवली येथे होणार

 

कणकवलीत शिवसेननेची मुसंडी मारण्याची तयारी

प्रतिनीधी -रविकांत जाधव

कणकवली–शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा उदघाटन १० जानेवारी रोजी संध्याकाळी ४.०० वाजता महाडिक कंपाउंड, नरडवे नाका कणकवली येथे सन्मा. शिवसेना सचिव तथा खासदार विनायकजी राउतसाहेब व सन्मा. पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंतसाहेब यांच्या हस्ते होणार आहे . यावेळी माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर,जिल्हा संपर्कप्रमुख अरुनभाई दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आम. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते , सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत , सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, हिंद कामगार सेनेचे अध्यक्ष आप्पाभाई पराडकर, सन्मा. अतुलजी रावराणे, सन्मा.बाळा भिशे, देवगड तालुकाप्रमुख विलास सालसकर व मिलिंद साटम, वैभववाड़ी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हा प्रमुख राजू शेटये ,नंदु शिंदे, सुजीत जाधव ,महिला संघटक नीलम पालव ,युवा सेनेचे गीतेश कडू उपस्थित रहाणार आहेत. तरी शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख ,उप विभाग प्रमुख, युवासेना तालुका अधिकारी, महिला तालुका संघटक ,शहर प्रमुख, उपशहरप्रमुख,नगरसेवक, जिप सदस्य, पस सदस्य, युवासेना व महिला विभाग प्रमुख , सरपंच, उपसरपंच , शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख शैलेश भोगले आणि प्रथमेश सावंत यांनी केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!