शासकीय

आजगाव ग्रामपंचायतीला आलेल्या त्या पत्राने एकच खळबळ

*आजगाव ग्रामपंचायतीला आलेल्या त्या पत्राने एकच खळबळ* :-

 

*गावात मायनिंग सुरू करण्याबाबत हालचाली*

.

*गावात ड्रोन द्वारे होणार मायनिंग विषयक तपासणी सर्व्हे*.

 

*मायनिंग सुरू झाल्यास आजुबाजूच्या गावांना सुद्धा बसणार फटका*

.

 

,आजगाव ग्रामपंचायत कडे गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी सहा वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले . त्या पत्रात असे नमूद आहे की, मायनींग साठी ड्रोन ने सर्व्हे करायची परवानगी कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने तसेच जिल्हाधिकारी (कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक ८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार आहेत .

आजगाव ग्रामपंचायत ने त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही .तरीही त्यांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायत ची परवानगी मागायला आलो नाही फक्त सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्राम पंचायत ला कळवीत आहोत.सदरील पत्रात ८४० हेक्टर एवढी आजगाव ब्लॉक मधील जमीन महाराष्ट्र सरकार कंपनी ला मायनींग साठी देणार आहे ,त्यासाठी खनिज साठा किती आहे याची तपासणी करण्याबाबत चे हे पत्र आहे .

अतिशय गंभीर असा हा विषय असून ८४० हेक्टर मध्ये येथील लोकांची जमीन ,घरे ,बागबागायत घेणार आहेत की.कसे काय हे आज तरी सांगता येत नाही आजगाव तसेच आजूबाजूच्या गावावर आलेले हे मायनिंग रूपी संकट आहे ,त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी एकत्र एकजुटीने येत या निर्णयाला प्रखर विरोध करणार असल्याचे येथील सर्व जनतेने म्हटले आहे.

सोमवारी होणाऱ्या या सर्व्हे बाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याने सर्व ग्रामस्थांची रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता आजगाव मराठी शाळा वाचनालय हॉल येथे सभा आयोजित केली आहे. तरी गावातील सर्वांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!