गुंतवणुकीतून लाभाचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक..
*🛑 गुंतवणुकीतून लाभाचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०५:-* गुंतवणुकीवर अधिक लाभाचे आमिष दाखवून जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी राहुल कलाप्पा आळते (३८, रा. साईशब्द अपार्टमेंट, कणकवली) यांची अज्ञात भामट्याने तब्बल १५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. १४ एप्रिल ते १७ जून या कालावधीत घडलेल्या या प्रकाराबाबत आळते यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आळते यांना १४ एप्रिलला फेसबुकवर ट्रेडिंगची एक जाहिरात दिसली. त्यांनी तेथील ‘ई-१४४’ असे नाव असलेल्या लिंकला क्लिक केले. त्यानंतर अज्ञात भामट्याने त्यांना ‘मनीसुख स्टॉक स्टडी’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅड केले १९ एप्रिलला विरेंदर मनसुखन असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने आळते यांच्याशी व्हॉट्सअॅप नंबरवर चॅट करून ट्रेडिंगबाबत काही माहिती दिली. यावेळी विरेंदर याने आदिती सिंग नावाच्या महिलेचा नंबर आळते यांना दिला. व त्या नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार आळते यांनी २० एप्रिलला आदिती हिच्यासोबत संपर्क साधला. या महिलेले आळते यांना गुंतवणुकीसंदर्भात माहिती देत ‘प्रायमरी ट्रेडिंग अकाऊंट उघडायला सांगितले. त्यानुसार आळते यांनी १० मे रोजी आपल्या पत्नीच्या नावे प्रायमरी ट्रेडिंग अकाऊंट उघडले.
१० मे रोजी आळते यांना अज्ञाताचा फोन आला. पलिकडून बोलणाऱ्याने ५० हजार रुपये रक्कम गुंतवायला सांगितले व खाते नंबर पाठविला. त्यानुसार आळते यांनी ५० हजार रुपये खात्यात पाठवले. १५ मे रोजी आळते यांच्या खात्यात ७ हजार ३०० रुपये बोनस जमा झाला होता. त्यामुळे आळते यांचाही विश्वास बसला पुढे संशयित भामट्याने सांगितल्यानुसार आळते यांनी १७ जूनपर्यंत जवळपास १५ वेळा मिळून १५ लाख ४० हजार रुपये सदरच्या खात्यात भरले. २० जूनला आळते यांनी ट्रेडिंग ग्रुपवर पाहिले असता त्यांना आपल्या खात्यामध्ये तब्बल २ कोटी ३४ लाख ६७ हजार ८११ रुपये जमा असल्याचे दिसले. आळते यांनी आतापर्यंत गुंतवलेली रक्कम १५ लाख ४० हजार रुपये होती व खात्यात २ कोटी ३४ लाख ६७ हजार ८११ रुपये जमा असल्याने आपल्याला जवळपास २ कोटीहून अधिक रुपयांचा फायदा झाला असे आळते यांना वाटले, त्यांनी नफ्याच्या रकमेतील ५० लाख रुपये काढण्यासाठी मनीसुख अॅपद्वारे रिक्वेस्ट केली. मात्र, ही रक्कम काढण्यासाठी संबंधित रकमेच्या २५ टक्के म्हणजे १२ लाख ५० हजार रुपये भरावे लागणार, असे भामट्याने सांगितले. आळते यांनी एवढी रक्कम नसल्याचे सांगितल्यानंतर पलिकडून बोलणाऱ्याने ५ लाख भरण्यास सांगितले. आळते यांनी तेही अमान्य केल्यानंतर पलिकडून बोलणाऱ्याने किमान एक लाख रुपये भरण्यास सांगितले. अखेरीस आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने आळते यांनी पोलीस ठाणे गाठले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

