कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीय

जिल्ह्यातील सुमारे ४० वैद्यकीय अधिकारी तीन महिने पगाराविना

*🛑जिल्ह्यातील सुमारे ४० वैद्यकीय अधिकारी तीन महिने पगाराविना*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि- ०५:-* प्राथमिक आरोग्यकेंद्र स्तरावर काम करणाऱ्या सुमारे ४० हून अधिक बीएएमएस व बंधपत्रित एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही. गेल्या वर्षभरात अशाप्रकारे पगार रखडण्याची ही तिसरी वेळ आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येकवेळी बीले ट्रेझरीकडे गेल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही, पगार होत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. वास्तविक हे पगार अदा करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे पगार वेळेत होत असल्याने त्यांना याबाबतचे गांभीर्य नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षभराचा विचार केला तर या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेकदा तीन – चार महिन्यानंतरच हा पगार अदा केला जातो. प्रत्येकवेळी निधी उपलब्ध नसल्याचे पगार बिल टेझरीकडे गेले असल्याचे साचेबद्ध उत्तर दिले जाते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचा संपूर्ण डोलारा
याच डॉक्टरांवर अवलंबून आहे. एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाले नाही की, शासनाला बीएएमएस डॉक्टरांची आठवण येते. मात्र, एमबीबीएस उपलब्ध झाले की त्यांना वाऱ्यावर सोडले जाते, हे नेहमीचेच आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन-चार महिने पगार होत नसेल तर त्यांनी करायचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गतवर्षी सुरूवातील एप्रिल २०२३ पासून पुढे पाच महिन्यांचा पगार झालेला नव्हता. त्यानंतर पुन्हा मार्च महिन्यापर्यंत पगार झाला नाही.. प्रत्येकवेळी या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर विचारणा केली की ठरलेली उत्तरे सांगून त्यांना पाठवून दिले जाते. आताही एप्रिल ते जून अशा तीन महिन्यांचा पगार झालेला नाही. एकीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता कमी असताना दुसरीकडे पुन्हा त्यांचे महिनोंमहिने फ्गार होत नसतील तर अधिकाऱ्यांसोबतच राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधीही काय करतात? असा सवाल उपस्थित होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!