जि. प. शाळांच्या शनिवारच्या वेळेत बदल
*🛑जि. प. शाळांच्या शनिवारच्या वेळेत बदल*
*🛑सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान भरणार शाळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- ०५:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्या शनिवारच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता जिल्हयातील प्राथमिक शाळांची शनिवारची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ अशी राहणार आहे. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ बदलण्याबाबतची सूचना राज्यपालांनी ५ डिसेंबर २०२३ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला केली होती. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व पाथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरविण्याबाबतचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील शाळांची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० अशी आहे. तर शनिवारी सकाळी ७.३०’ ते ११ आहे. मात्र, आता शनिवारी सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेच्या वेळेत ६ जुलैपासून बदल करण्यात आला आहे. अनेक जि. प. शाळांमध्ये पहिली ते चौथीबरोबरच पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू आहेत. शनिवार ६ जुलैपासून पुढील प्रत्येक शनिवारी जिल्हयातील सर्वच जि. प. शाळांची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ अशी करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

