17 वर्षापासून 710 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमोशन रखडले
- *🛑17 वर्षापासून 710 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमोशन रखडले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०५:-* मागील 17 वर्षापासून राज्यातील 710 वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्ग पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. याप्रकरणी राज्यपत्रीत वैद्यकीय अधिकारी महासंघाने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला संघटनेच्या निरंतर लढ्यामुळे शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादी जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध केली मात्र सहा महिने होऊनही यादीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नाही पदोन्नतीची यादी तयार आहे तर पदोन्नती बाबत निर्णय घेण्यासाठी शासन टाळाटाळ का करत आहे असा प्रश्न राज्यातील पदोन्नतीचे प्रतीक्षेतील गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरकारला केला आहे. 2019 मध्ये गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश झाला असताना त्यावेळी त्यांचा गट अ मध्ये समावेश होणे अपेक्षित होते. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यावेळी गट ब संवर्गात समायोजन करून शासनाला सहकार्य केले .शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना ठराविक सेवेनंतर विभागीय पदोन्नती देण्यात येते .परंतु आरोग्य विभागातील गट ब वैद्यकीय अधिकारी संवर्गात कायम पदोन्नती पासून उपेक्षित राहिला आहे .पदव्युत्तर पदवीधारक गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांंकरिता शासनाचे कुठेलेही निश्चितह धोरण नाही आयुर्वेदामध्ये एम, डी, एम, एस झालेल्या कित्येक अधिकाऱ्यांना गट ब पदावर कार्य करावे लागते ही गट ब वैद्यकीय अधिकारी संवर्गाची शोकांतिका आहे. निरंतर पाठपुरावा करून सुद्धा राज्यातील गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक वर्षांपासून पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही. कित्येक अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र असूनही वंचित आहेत तर काहीजण सेवानिवृत्त झाले आहेत .यांना एकाच पदावर संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागत आहे पदोन्नती पात्र राज्यातील 710 वैद्यकीय अधिकारी गट ब हे मागील सतरा वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहेत. यातही कित्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गट ब पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवलेला आहे गट ब वैद्यकीय अधिकारी हे गट अ पदाचा अतिरिक्त कार्यभार संभाळू शकतात त्यांना त्यांच्या हक्काचे रिक्त जागी गट अ पदावर पदोन्नती देण्यास टाळाटाळ का असा संतप्त प्रश्न गट ब वैद्यकीय अधिकारी यांनी केला आहे. आगामी विधानसभेची निवडणूक बघता अतिशय वेगाने जनहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत मात्र 17 वर्षे पासून दुर्लक्षित प्रश्न जैसे थेच आहे. तातडीने हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
