🛑 उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी ग्राउंड पातळीवर जात साधला संवाद..
🛑 हत्ती पकड मोहीम राबविणे हीच आमची प्रमुख मागणी ; नुकसानग्रस्त शेतकरी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०३:- रानटी हत्ती सातत्याने नुकसान करत असतात. वरिष्ठ वनअधिकारी थेट शेती शिवारात पोहचत नव्हते मात्र उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ग्राउंड पातळीवर जात संवाद साधला. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी केर येथे चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी, हत्ती पकड मोहीम राबविणे हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे सांगत अनेक व्यथा मांडल्या. यावेळी श्री. रेड्डी यांनी वनविभागाने आपल्या ज्या व्यथा ऐकल्या त्या किती प्रमाणात समाधान करू शकलो याचा अहवाल गावात येऊन वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी दर १५ दिवसांनी देतील अशी ग्वाही देत हत्ती पकड हीच प्रमुख मागणी ग्रामस्थांची असल्याचे शासनाला कळविले आहे पुन्हा पत्रव्यवहार करू याची हमी दिली.
यावेळी श्री. रेड्डी यांच्यासमवेत सहाय्यक वनसंरक्षक श्री लाड यांनी हत्ती बाधित केर,मोर्ले, घोटगेवाडी गावामध्ये भेट देऊन शेतीची हत्तीकडून झालेली नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी दोडामार्ग वनक्षेत्रपाल व्हि .एस.मंडल , सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर , वनपाल कोनाळ किशोर जंगले,फिरते पथक स्टाफ, दोडामार्ग स्टाफ आणि सावंतवाडी स्टाफ उपस्थित होते. यावेळी हत्ती पकड या प्रमुख मोहिमेसह शेतकरी विमा, पंचनामा क्लिष्ट बाबी, नुकसानभरपाई वाढीव, सामाविष्ठ नसलेली पिके, शेतकरी शेतीत जात नसल्याने होणारे नुकसान, प्रति कुटुंब अनुदान, सोलर – स्ट्रीट लाईट, लघु उद्योग निर्मिती, फळबाग लागवड अनुदान यांसह अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
*वनविभागाने सातत्य ठेवावे*
उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी थेट शेती नुकसानीपर्यंत पोहचण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागताह असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले मात्र यात सातत्य ठेऊन जेव्हा वनविभाग शेतकऱ्यांच्या मागण्याचा पाठपुरावा करून दिलासा देईल त्याचवेळी खरे समाधान होणार आहे
*हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रात नेण्यासाठी मोहीम*
सध्या हत्ती गावठण क्षेत्रात आहेत त्यामुळे असणारी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली श्री. रेड्डी यांनी हे अंतरही पाहिले. ग्रामस्थांनी हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रापर्यंत न्या अशी मागणी केली त्याला अधिकाऱ्यानी प्रतिसाद दिला. मात्र पावसाळी हंगामातील अडचणीवर चर्चेअंति पाऊस कमी झाल्यावर याबाबतीत निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

