कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

मळेवाड केंद्राच्यावतीने केंद्रप्रमुख श्री. म.ल.देसाईंचा सेवानिवृत्तीपर सत्कार

*🛑मळेवाड केंद्राच्यावतीने केंद्रप्रमुख श्री. म.ल.देसाईंचा सेवानिवृत्तीपर सत्कार*

*🛑कठोर परिश्रम घेतल्यास यश संपादन करता येते – म.ल.देसाई*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴मळेवाड, दि- ०२:-* अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संयुक्त सरचिटणीस श्री म.ल. देसाई सर यांचा मळेवाड केंद्राच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ केंद्रशाळा मळेवाड नं.१ येथे पार पडला.या समारंभाला आजगाव प्रभागाच्या माजी शिक्षण विस्तार अधिकारी मा दुर्वा साळगावकर मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी मा .पावसकर सर, माजी केंद्र मुख्याध्यापिका मंजुषा मांजरेकर मॅडम तसेच विषय तज्ञ सातार्डेकर मॅडम आणि मळेवाड केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्रीम. दुर्वा साळगावकर मॅडम , मंजुषा मांजरेकर मॅडम श्री पावस्कर सर, श्रीम सातार्डेकर मॅडम,शीतल वेंगुर्लेकर मॅडम, संजय बांबुळकर सर तसेच केंद्रातील शिक्षकांनी देसाई सरांविषयीच्या आपल्या आठवणी कथन केल्या. देसाई सर यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख पदावर काम करत असताना विविध अंगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचां तसेच शिक्षकांचां सर्वांगीण विकास साधला. प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाच्या प्रसंगात मदत केली. देसाई सर हे समाजाच्या हितासाठी सतत कार्यरत होते.जिल्ह्यातील शिक्षकांचे त्यांनी पालकत्व स्वीकारलेले होते. शिक्षकांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर रोखठोक मांडणे व त्या लीलया सोडवणे यात देसाई सरांची हातोटी होती. देसाई सरांविषयी असलेले प्रेम जिव्हाळा हे प्रत्येकाच्या मनोगतातून यावेळी दिसून आले. देसाई सरांनी ही आपला शिक्षक ते राज्य संयुक्त सरचिटणीस पदापर्यंतचा खडतर प्रवास कसा झाला हे यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांनी देसाई सरांना पुढील आयुष्य निरोगी सुख समृद्धी युक्त जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री विजय गावडे यानी केले तर आभार श्री कळसुरकर सर यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!