दुचाकी चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद
*🛑दुचाकी चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१५*:-कुडाळ-शिवाजी पार्क येथून पोलीस कर्मचारी अनिल पाटील यांची बुलेट चोरून नेताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, त्याने हेल्मेट घातले होते.१२ जून रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे पावणेतीन वाजण्याच्या – सुमारास शहरातील शिवाजी पार्क येथून कुडाळ बाजारपेठ, ओटवणेकर तिठा, लक्ष्मी मंदिर, आर. एस. एन. हॉटेलकडून मुंबई-गोवा महामार्गावर तो चोरटा बुलेट घेऊन गेला. मात्र, त्यानंतर महामार्गावरील कुठल्याच ‘सीसीटीव्हीमध्ये तो कैद झालेला नाही. त्यामुळे त्यानंतर ती बुलेट टेम्पोतून पुढे वाहतूक करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. गोवा व कर्नाटक राज्यात गाड्या हातोहात चोरणाऱ्या टोळ्या असून त्यांचाच या चोरीमागे असण्याची शक्यता आहे. पाटील हे आपल्या ताब्यातील बुलेट ते राहत असलेल्या शहरातील शिवाजी पार्क कॉम्प्लेक्सबाहेर उभी करून रात्री साडेनऊ वाजता घरात गेले. चोरट्याने ज्या मार्गाने दुचाकी बाहेर काढली, तो रस्ता व चौक कधीही, कोणी फिरकू शकतो, असा आहे, तरीही दुचाकी बाजारपेठेतून बाहेर नेण्यात आली. शहर झोपी गेले असताना ही चोरी पद्धतशीरपणे करून शहरातील रस्त्यांची व महामार्गाची पूर्ण माहिती घेऊनच दुचाकी बाहेर नेण्यात आली. हॉटेल आर. एस. एन. नंतर ही बुलेट कोणत्याच सीसीटीव्हीमध्ये कैद झाली नाही. याबाबत पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

