जेसीबी चालकासह पोटठेकेदारावर गुन्हा

*🛑जेसीबी चालकासह पोटठेकेदारावर गुन्हा*

*🛑महाविद्यालयीन युवकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांची कारवाई*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४*:-सावंतवाडी शहरातील मार्गावरील रुग्णालयासमोर जेसीबीच्या धडकेत उपचारादरम्यान महाविद्यालयीन दुचाकीस्वार मनिष महादेव देसाई (१९, रा. खासकीलवाडा- सावंतवाडी) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेसीबी चालक मोहन बहादूर राठोड (३३, सध्या रा. बाहेरचावाडा, मूळ विजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेसीबी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात संबंधीत पोटठेकेदार महेंद्र सांगेलकर दोषी असून त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी दिली. या गुन्ह्याच्या तपासात आणखी कोण दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ४ जून रोजी मनिष देसाई हा महाविद्यालयीन विद्यार्थी आपले बारावीचे गुणपत्रक आणण्यासाठी दुचाकीने शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-गोवा महामार्गाने जात असताना उपजिल्हा रुग्णालयासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जेसीबीची धडक बसून मनिष देसाई याच्या मानेच्या ठिकाणी जेसीबीच्या बकेटचे लोखंडी दात लागून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर बांबोळी-गोवा रुग्णालयात उपचार सुरू असताना पाच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी जेसीबी चालक मोहन राठोड याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करून जेसीबी जप्त केला होता. मात्र, दोषी असलेल्यावर कारवाई होण्यास दिरंगाई होत असल्याने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुजाण नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांची भेट घेतली. त्यावेळी या गुन्हयाचा पारदर्शक तपास करून दोषी असणारे जेसीबी चालक, संबंधित ठेकेदार, सबठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करून अटक करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पोलीस यंत्रणेने गुन्ह्याच्या तपासला गती देत बांबोळी येथून मयत मनिष देसाई याचा मृत्यूचा दाखला मिळवत जेसीबी चालक मोहन राठोडसह संबंधीत पोटठेकेदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी दिली. तपासात आणखी कोण दोषी आहेत, याचे तपासात उघडं झाल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे पोलिसानी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!