कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी एसटी आगार परिसर पुन्हा बनला खड्डेमय

*🛑सावंतवाडी एसटी आगार परिसर पुन्हा बनला खड्डेमय*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१२*:-सावंतवाडी एसटी आगार परिसरातील खड्डे गतवर्षी बुजविल्यानंतर आता पुन्हा खड्डे पडल्याने पावसाच्या पाण्याने परिसर चिखलमय झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना चिखलमय पाण्याचा सामना करावा लागणार आहे. एस. टी. महामंडळाने मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. सावंतवाडी आगार व बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम गेली सहा वर्षे रखडले आहे. त्यामुळे जुन्या बसस्थानक इमारतीची तात्पुरती डागडुजी करून प्रवासी सेवेसाठी वापर केला जात आहे. बसस्थानकाच्या परिसरात दरवर्षी खड्डे पडत असल्याने पावसाळ्यात, प्रवाशांना चिखलमय खड्डयातून जावे लागते. तर खड्ड्यांमुळे एसटी बसेसही चालविताना चालकासह प्रवाशांना धक्के बसतात. गतवर्षी आवारातील खड्डे बुजविण्याबाबत सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी संघटना यांनी आवाज उठविल्यानंतर गणेश चतुर्थीपूर्वी सिमेंट काँक्रिट व दगड भरून खड्डे बुजविण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास दूर झाला. अवघ्या दहा महिन्यांनी आगाराच्या परिसरात पुन्हा खड्डे पडले. पहिल्या पावसातच खड्ड्यांमध्ये पाणी साचले. प्रवाशांना चिखलमय पाण्यातून जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. नवीन बसस्थानक व आगाराचे बांधकाम सहा वर्षे पूर्ण होऊन गेली, तरी रखडलेले आहे. हे बांधकाम पावसाळ्यात करणे अशक्य आहे. त्यामुळे यावर्षीही इमारतीचे काम रखडल्यात जमा आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करणे गरजेचे आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!