वीज समस्या सोडवा, अन्यथा बिले भरणार नाही!
*🛑वीज समस्या सोडवा, अन्यथा बिले भरणार नाही!*
*🛑दांडेली ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना इशारा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴न्हावेली, दि-११*:-दांडेली येथे विजेचा खेळखंडोबा सातत्याने सुरू आहे. सध्या अस्तित्वात असलेली वीज लाईन व पोल हे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे सातत्याने वीज लाईन तुटणे, पोल कोसळणे व परिणामी वीजपुरवठा खंडित होणे हे नित्याचेच बनले आहे. याबाबतचे निवेदन दांडेली सरपंच नीलेश आरोलकर व माजी सरपंच संजू पांगम यांनी वीज अधिकाऱ्यांना दिले. दहा दिवसात विजेच्या समस्या दूर ‘न केल्यास दांडेलीतील एकही ग्रामस्थ वीज बिल भरणा करणार नाही. तसेच वीज कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून दांडेली ग्रामस्थांनी दिला आहे.वीज उपअभियंता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी अभियंता चव्हाण यांनी समस्या समजून न घेता उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत लवकरच संपूर्ण ग्रामस्थं त्यांना जाब विचारणार असल्याचेही पांगम म्हणाले. निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, दांडेली भागात सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे ग्रामस्थांना सातत्याने अंधारात राहवे लागते. वीज पुरवठा बंद असल्याने नळयोजना पाणीपुरवठा सुद्ध गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. या भागातील अनेक युवक- युवती ‘वर्क फ्रॉम होम’ काम करीत असून त्यांना तसेच व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थ व सावंतवाडी वीज अधिकारी यांच्यात दोन ते तीन वेळा बैठकाही झाल्या. मात्र, बैठकीत ठरल्याप्रमाणे वीज समस्या दूर करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले नाही. मे अखेरीस झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये बरेच पोल व लाईनवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबत वीज वितरणकडून सर्व्हेही अद्याप करण्यात आला नाही. तसेच वीज मार्गातील, झाडेही तोडण्यात आली नाही. बांदा भागातून येणारी लाईन जीर्ण झाल्यामुळे मळेवाड सबस्टेशनवरून दांडेली गावाला वीज पुरवठा करण्यात यावा, असे म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

