आरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

एक्स-रे विभागाचा भार एकाच कर्मचाऱ्यावर

*🛑एक्स-रे विभागाचा भार एकाच कर्मचाऱ्यावर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११*:-सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे विभाग गेल्या दोन वर्षांपासून एकाच कर्मचाऱ्यावर अवलंबून असल्याने रुग्णांना एक्स- रेसाठी ताटकळत बसावे लागत आहे. एक्स-रेसाठी रुग्णसंख्या वाढत असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असताना आरोग्य प्रशासन दखल घेत नाही.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे विभागासाठी किमान तीन कर्मचाऱ्यांची गरज आहे. एक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर एकाच कर्मचाऱ्यावर एक्स-रे विभाग अवलंबून आहे. एका रुग्णाचा एक्स-रे काढण्यासाठी नावनोंदणीपासून ते एक्स-रे देईपर्यंत किमान पंधरा मिनिटे लागतात. एका दिवसात ३० ते ३५ जणांचा एक्सरे काढण्यासाठी कार्यरत कर्मचाऱ्यावर ताण पडत आहे. त्यात रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या उद्धट वर्तनाचा सामनाही करावा लागत आहे. चार दिवसांपूर्वी माजगाव येथे झालेल्या अपघातातील जखमींचे एक्स-रे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने सायंकाळी उशिरापर्यंत काढून सेवा दिली. तरीही नाहक रोषाला त्याला सामोरे जावे लागले. एक्स-रे विभागात किमान तीन कर्मचारी नियुक्ती आवश्यक आहे. पावसाळ्यात आजाराच्या उद्भवणाऱ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक्स-रे विभागात कायमस्वरुपी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!