आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा गरजूंनी लाभ घ्यावा – डॉ मोहन जोशी
*🛑 आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा गरजूंनी लाभ घ्यावा – डॉ मोहन जोशी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१०*:-गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानमध्ये आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडविणे तसेच रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी काम केले जाते. आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. आयुर्वेद संस्थानची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत असून आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉ मोहन जोशी यांनी केले.
गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ओटवणे मांडवफातरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ मोहन जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे, डॉ प्रसाद नार्वेकर, डॉ अखिला एम, डॉ रश्मी जोशी, ओटवणे येथील मुंबईस्थित उद्योजक सुरेश तावडे, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, प्रकाश पनासे, दाजी सावंत, रामचंद्र म्हापसेकर, शंकर म्हापसेकर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे कर्मचारी सुमा नाईक, पूजा झोळंबेकर, गिरीश नाईक, ओंकार पाटील, प्रमोद सावंत, सागर धुरी आदी उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन डॉक्टर मोहन जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सुरेश तावडे यांच्याहस्ते श्री गणपती आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या शिबिरात डॉ मोहन जोशी, डॉ प्रशांत ससाणे, डॉ प्रसाद नार्वेकर, डॉ अखिला एम, डॉ रश्मी जोशी, हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी केली.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवफातरवाडी प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराला मुसळधार पाऊस असूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मांडवफातरवाडी परिसरातील सुमारे २०० आबालवृद्धांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.
या शिबिराचे संकल्प सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी मांडवफातरवाडीतील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संकल्प सेवा संघाच्यावतीने डॉ मोहन जोशी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रथमेश सावंत यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

