कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

स्ट्रीटलाईट दुरुस्ती करताना शॉक लागून वायरमन जखमी

*🛑स्ट्रीटलाईट दुरुस्ती करताना शॉक लागून वायरमन जखमी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-०७*:-निगुडे-गावठणवाडी येथे स्ट्रीटलाईटच्या खांबावर काम करताना शॉक लागून कंत्राटी वायरमनच्या हाताला दुखापत झाली. गुरुनाथ मंगेश कुडव (रा. इन्सुली- सावंतटेंब) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बांबूने लाईनवर अडकलेला त्याचा हात बाजूला केल्याने ते बचावले. त्यांना बांदा येथे उपचारासाठी आणले. तर तेथून सावंतवाडी येथे हलविले. तेथे उपचार करून त्याला घरी पाठविले. मात्र, एवढी मोठी घटना घडूनही वीज वितरणकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गुरुनाथ कुडव हे निगुडे येथे कंत्राटी वायरमन म्हणून काम करतात. बुधवारी सायंकाळी ते निगुडे गावठणवाडी येथे स्टीटलाईट दुरुस्तीचे काम करत होते. लाईनचे काम करत असताना त्यांनी वीजपुरवठा बंद केला होता. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत कर्मचारीसुद्धा होते. ते तुटलेली लाईन जोडण्यासाठी खांबावर चढले. तेथील काम आटोपून उतरण्यासाठी म्हणून झोका काढत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. ते खांबावर लटकून राहिले. शॉक लागल्याचे सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वाळलेला बांबू आणत अडकलेला हात लाईनपासून बाजूला केला. त्यानंतर कुडव स्वतः खाली उतरले. मात्र, शॉकमुळे हाताला गंभीर इजा झाली होती. त्यांच्यावर बांदा आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून, सावंतवाडी येथे पाठविले. तेथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी बांदा अभियंता अनिल यादव, निगुडे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!