दोडामार्ग-धाटवाडी येथे दारुअड्ड्यांवर छापा
*🛑दोडामार्ग-धाटवाडी येथे दारुअड्ड्यांवर छापा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-०५*:-शहरातील घाटवाडी येथे अवैध दारू अङ्ख्यावर दोडामार्ग पोलिसांनी सोमवारी रात्री १०.१५ च्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. १० हजार ५० रुपयांच्या अवैध दारुसह २३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयित जानू पदू कोळेकर (५८) व संतोष रामचंद्र वडर (२९, दोघेही रा. कसई-धाटवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली. दोडामार्ग पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांवरील कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. साटेली-भेडशी येथील आवाडे येथे दोन दारू अड्यांवर पोलीस व एलसीबीने संयुक्तरित्या कारवाई केली. रात्री अजून एक कारवाई केली. त्यांनी कसई- घाटवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकली. किंगफिशर प्रीमियम कंपनीचे लेबल प्रत्येकी १५० रुपये किमतीचे बिअरचे नऊ पत्र्याचे टीन, गोल्डन एस ब्ल्यू फाईन व्हिस्की लेबल असलेले प्रत्येकी १०० रु. किमतीच्या ५४ बाटल्या, मेक डॉवल्स नंबर वन लेबल असलेले प्रत्येकी १०० रु.च्या तीन बाटल्या गोवा बनावटीची दारू जप्त केली. १३,७०० रु. रोख रक्कम हस्तगत केली. संशयित कोळेकर व वडरवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक आशिष भगत, सहाय्यक फौजदार गवस, हवालदार विठोबा सावंत आदींनी ही कारवाई केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

