कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

कोकणचा विकास राणेच करु शकतील !

*🛑कोकणचा विकास राणेच करु शकतील !*

*🛑शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०५*:-सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी, या दोन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे केलेल्या कामामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय झाला. राणे हे कोकणचे सुपुत्र असून ते या कोकणचा विकास करू शकतात हे जनतेला कळले आहे. निश्चितच ते आता केंद्रात मंत्रिमंडळात समाविष्ट होतील आणि या कोकणचा विकास करतील. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार आणि जनता महायुतीच्या पाठिशी राहिली. त्यामुळे ही प्रेमाची उतराई आम्ही विकासकामातून करून देणार, अशी प्रतिक्रिया राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईतून दूरध्वनीवरून दिली.श्री. केसरकर मुंबई येथे प्रकृती अस्वस्थ्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल असतानाही ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येऊ शकले नाहीत. केसरकर पुढे म्हणाले, मी येत्या दोन मतदारसंघात आभारं दिवसात जनतेचे मानण्यासाठी येणार आहे. खरं तर मला अत्यानंद झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हा मोठा विजय सिंधुदुर्ग-रत्नागिरी आहे. या दोन्ही जिल्ह्यातील एकसंघपणामुळेच हा विजय झाला. माझी आणि राणे यांची युती झाली, अशी टीका विरोधकांनी केली खरंतर होती. विकासकामासाठी मी नियमित चांगल्याच्या बाजूनेच असतो आणि माझ्या युतीबाबत जी टीका ‘झाली त्याला मतदारांनी मतपेटीतून उत्तर दिले आहे.सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याचे हे फळ आहे. या भागाचा विकास महायुतीच्या माध्यमातून होऊ शकतो हे येथील जनतेला कळले आणि म्हणूनच येथील जनता महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पाठिशी राहिली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३७ हजाराचे मताधिक्य मिळाले. मात्र, काही एकगठ्ठा मते धुर्वीकरणाच्या राजकारणात विरोधकांना गेलीत आणि त्यामुळे तीन ते पाच हजार मताधिक्य कमी झाले. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जी मेहनत घेतली त्यांचे मी मनापासून आभार मानतो. राणेंना मंत्रिमंडळात निश्चित स्थान मिळणार असून ते या भागाचा विकास निश्चित करणार आहेत, असेही केसरकर म्हणाले या मतदारसंघातील जनतेने विकासाला मतदान केले आहे आणि या भागातील जनतेला विकास हवा आहे आणि तो विकास आम्हीच करू शकतो. निश्चितपणे या विजयाची, प्रेमाची ही उतराई आम्ही विकासकामातून करून दाखवणार, असेही ते म्हणाले. सध्या मी विश्रांती घेत आहे आणि येत्या दोन-तीन दिवसात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जनतेच्या आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी मी निश्चित येणार आहे, असे ते म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!