आरटीओची वाहन तपासणी मोहीम, पावणे दोन लाखाचा दंड
*🛑आरटीओची वाहन तपासणी मोहीम, पावणे दोन लाखाचा दंड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-०४*:-उप प्रादेशिक कार्यालयामार्फत परिवहन राबविण्यात आलेल्या वाहन तपासणी मोहिमेत १०० हून अधिक वाहन चालकांची – तपासणी करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन ‘करणाऱ्या वाहन चालकांकडून सुमारे पावणे दोन लाख रुपये दंड वसूल केला आहे.प्रवासी वाहन चालकांकडे वैध वाहन परवाना नसणे, परमिट नसणे, वाहनामध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित नसणे, दरवाजाच्या मार्गात अडथळा असणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, वैध वाहन बॅच बिल्ला नसणे, वाहनांना परावर्तिका नसणे तसेच विहित गणवेश धारण न करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. महामार्गावर ठिकठिकाणी ‘अल्कोहोल चाचणी मशीन’द्वारे चालकांची मद्यपानाची तपासणी करण्यात आली.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हयात मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबवली गेली. या मोहिमेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी मालवाहू वाहने, मुंबई-गोवा प्रवासी वाहतूक करणारी प्रवासी वाहने यांचा समावेश आहे. १ व २ जून रोजी झालेल्या या मोहिमेत सुमारे १०० पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करून त्यामध्ये दोषी आढळलेल्या वाहनांकडून पावणेदोन लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. चालकांना मद्यपान करून वाहन न चालविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, अमोल दांडेकर व वाहनचालक संजय केरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

