कॉम्प्लेक्समुळे भविष्यातील समस्यांवर जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा
*🛑कॉम्प्लेक्समुळे भविष्यातील समस्यांवर जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा*
*🛑मनसेचा हा आगळा-वेगळा उपक्रम ! : १० जूनपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०४*:-शहरी भागात मोठ मोठ्या कॉम्प्लेक्स उभारल्या जात आहेत. हेच बांधकाम भविष्यात शहरी फ्लॅट्सधारक व नागरिकांची फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे. हे होऊ नये म्हणून जनजागृती व्हावी. या उद्देशाने या कॉम्प्लेक्स विषयावर आधारित एक आगळी वेगळी उपरोधिक अशी सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली निबंध स्पर्धा मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली आहे.मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १० जूनपर्यंत नावनोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले आहे.मानवाच्या प्रगतीबरोबर शहराचा सुद्धा प्रचंड वेगाने विस्तार होत आहे. या विस्तारामध्ये बिल्डिंग बांधकाम बिल्डर्स यांचा मोठा सहभाग असतो. परंतु मानवी हिताकडे दुर्लक्ष करून फक्त स्वार्थी हेतूने बांधकाम परवाना, नियम धाब्यावर बसवून बिल्डर लॉबी ही शासकीय यंत्रणेला हाताशी धरून बांधकाम करताना पाहायला मिळतात. अशी बांधकाम भविष्यात नागरिकांना त्रासदायक ठरणार आहेत. त्यासाठी समाजात जनजागृती व्हावी नागरिक सजग होतील व भविष्यातील भीषण समस्या उद्भवणार नाहीत. म्हणून या एका आगळ्या-वेगळ्या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरांची आजची स्थिती पाहताना शहरांना वाली कोण ? असा प्रश्न आहे.ज्या प्रदेशात एका बाजूला पश्चिम घाट आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामध्ये अंतर कमी आहे. अशा ठिकाणी आपण कसे शहर डिजाइन केले पाहिजे याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. भविष्यात सौंदर्यदृष्टी हरवलेली सिंधुदुर्गातील भकास शहर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. हे होऊ नये म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने जनजागृतीचा एक प्रयोग व एक प्रयत्न आम्ही करीत असल्याचे परब यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ३३३३ ., द्वितीय २२२२ रु., तृतीय ११११ रु व प्रत्येकी सन्मानचिन्ह अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. भ्रष्ट शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या पथ्यावर, व्हाईट कॉलर बिल्डर बनले शहरांचे भक्षक, सांडपाणी (ड्रेनेज वॉटर) व्यवस्था भविष्यातील शहरांची डोकेदुखी-मोठी समस्या, बिल्डर शहरांचे विकासक की भकासक. स्पर्धकांनी पाठविलेला निबंध स्वः हस्ताक्षरात असावा, निबंध शब्द मर्यादा ७०० शब्द असावी, निबंध स्वतःचाच आणि वास्तववादी विचार मांडणारा असावा. तसेच आधारकार्ड झेरॉक्स आहे. आवश्यक निबंध हस्त पोच किंवा पोस्ट, कुरियर माध्यमातून निबंध १० जूनपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावेत. धीरज परब, कुडाळ-हिंदुकॉलनी, साई दर्शन बिल्डींग, साई मंदिर समोर निबंध कागदाच्या एका बाजूने लिहिलेला असावा. स्पर्धेचे बक्षीस वितरण १४ जून रोजी करण्यात येणार आहे. निबंधासोबत स्पर्धकाने आपला नाव, पत्ता, संपर्क क्रमांक पाठवावा. अधिक माहितीसाठी यतिन माजगावकर- ७६६६६१३२२१, निरंजन रावराणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

