*केसरीचे मानकरी राघोजी सावंत यांचा देवसूत मानाची टोपी शाल श्रीफळ देऊन सत्कार
*केसरीचे मानकरी राघोजी सावंत यांचा देवसूत मानाची टोपी शाल श्रीफळ देऊन सत्कार*
*देवसू, दाणोली, केसरी,या तीन गावचे प्रमुख मानकरी हनुमंत सावंत यांनी केला सत्कार*
सावंतवाडी –
सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य,शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक,केसरी गावचे मानकरी राघोजी सावंत यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवसू दाणोली व केसरी या तीन गावचे प्रमुख मानकरी हनुमंत (मंथा) सावंत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मानाची टोपी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
देवसू दाणोली व केसरी या तीन गावचे प्रमुख मानकरी हनुमंत सावंत यांचा वाढदिवस व पोस्टातील निवृत्ती सोहळ्याच्या निमित्ताने देवसू येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली,यवेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले केसरी गावचे मानकरी राघोजी सावंत यांचा हनुमंत सावंत यांनी शाल श्रीफळ व मानाची टोपी घालून सत्कार केला व त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे,लवू लटम, सचिन सावंत,सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक सीताराम गावडे,रीक्षा युनियनचे सुधीर पराडकर,सुधीर सावंत,साईश गावडे,सौ संयुक्ता गावडे,लिंगोजी सावंत व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

