मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
तब्बल ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
समीर चव्हाण
कुडाळ
काल दि. १जुन २०२४ रोजी श्री. मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश चव्हाण मित्रमंडळ आयोजित आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग शाखा – कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगुळी बालोद्यान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ४२ (बेचाळीस ) रक्तमित्रांनी बहुमोल अस रक्तदान केले. सदर कार्यक्रमाचे उदघाट्न माजी. जि. प. उपाध्यक्ष श्री. रणजित देसाई साहेब यांच्या हस्ते झाले. शिबिराला भा.ज.पा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब., कुडाळ तालुका मंडळ अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर., मा.जि.प.अध्यक्ष. श्री. विकास कुडाळकर., युवा मोर्चा अध्यक्ष श्री रुपेश कानडे आणि श्री पप्या तवटे.,श्री राजन पांचाळ., श्री. अमित तेंडुलकर यांनी भेट देऊन मंडळाला शुभेच्छा दिल्या. जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्गच्या सर्व टीमचे नेहमी प्रमाणे उत्तम सहकार्य लाभले.. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सहकारी मित्र यांनी प्रचंड मेहनत घेतली.यावेळी सिंधु रक्तमित्रचे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश तेंडुलकर., श्री. यशवंत गावडे आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. मंडळाच्यावतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.

