खारेपाटण चेकपोस्टवर कारमध्ये आढळली बंदूक, काडतुसे
*🛑खारेपाटण चेकपोस्टवर कारमध्ये आढळली बंदूक, काडतुसे*
*🛑कणकवली पोलिसांची कारवाई : पाचजणांना अटक, गुन्हा दाखल शिकारीच्या उद्देशाने बंदूक बाळगल्याचा संशय*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०१*:-कारमध्ये विना परवाना बंदूक व काडतुसे बाळगल्याप्रकरणी मुटाट (ता. देवगड) येथील पाचजणांविरोधात कणकवली पोलीस, ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कणकवली पोलिसांनी खारेपाटण चेकपोस्ट येथे गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास केली. यात एक बंदूक, पाच जीवंत काडतुसे मिळून २३ हजाराचा मुद्देमाल तसेच कारही जप्त करण्यात आली. चेकपोस्टवर ड्युटीस असलेले कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई होऊ शकली. संशयितांनी बंदूक व काडतुसे शिकारीच्या उद्देशाने बाळगली होती, असे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी कार चालक जीतेंद्र बाबाजी पाळेकर (४०), गोपाळ लक्ष्मण पाळेकर (५४), संतोष राजाराम पाळेकर (५०, तिघेही मुटाट – पाळेकरवाडी), विसंजीत विश्वास साळुंके (३१), विनोद राजाराम साळुंके (३६,दोन्ही मुटाट बौद्धवाडी) अशा पाचजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.घटना अशी, बनसोडे चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी मुंबईच्या दिशेने जात असलेली राखाडी रंगाची बलेनो कार (एमएच ४७ एएन ०९१६) त्यांनी थांबविली. कारमध्ये चालकासह पाचजण होते. कार चालक जीतेंद्र पाळेकर याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय आल्याने बनसोडे यांनी कारची तपासणी केली असता आतमध्ये आकाशी काळ्या रंगाचे बॅटचे कव्हर व हेडटॉर्च दिसली. बेंटचे कव्हर उघडले असता आतमध्ये बंदूक आढळून आली.याबाबत बनसोडे यांनी कळविल्यानुसार कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे आदी चेकपोस्टवर दाखल झाले. चौकशीत गोपाळ पाळेकर याने सदरची बंदूक आपलीच असल्याचे सांगितले. मात्र, आपल्याकडे बंदुकीचा परवाना नसल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी विसंजीत साळुंके, विनोद साळुंके, संतोष पाळेकर यांची झडती घेतली असता विसंजीत याच्या खिशात एक, विनोद याच्या खिशात एक, संतोष याच्या खिशात तीन अशी एकूण पाच जीवंत काडतुसे आढळली. ही काडतुसे १२ एक्सप्रेस कंपनीची आहेत. संशयितांना अटक करून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कार, बंदूतक, काडतुसेही जप्त करण्यात आली. कॉन्स्टेबल बनसोडे यांच्या फिर्यादीनुसार संशयितांवर भारतीय शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पीएसआय शेगडे करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

